Pandurang Raykar | हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, एकनाथ खडसे आक्रमक

ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली (Eknath Khadse on Pandurang Raikar Death).

Pandurang Raykar | हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, एकनाथ खडसे आक्रमक
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 9:10 PM

जळगाव : “‘टीव्ही 9 मराठी’चे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या प्रकृतीबाबत ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू होणे ही एक दुर्दैवी बाब आहे”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवरदेखील निशाणा साधला आहे (Eknath Khadse on Pandurang Raikar Death).

“पत्रकार पांडुरंग रायकर यांना निव्वळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचं दुर्देवी निधन झालं. राज्य सरकारकडून योग्य सुविधा नाहीत. या असुविधेचा हा बळी आहे. या प्रकरणात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे”, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली (Eknath Khadse on Pandurang Raikar Death).

पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू 

संयतपणे पत्रकारिता करता करता पांडुरंग यांना कोरोनाने गाठलं. लढवय्या पांडुरंग यांनी कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. मात्र, ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांचा लढा अपुरा पडत गेला. पांडुरंग हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दुर्दैव म्हणजे पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र, धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

लढवय्या पांडुरंग यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या कशा पसरल्या आहेत, याकडे बोट दाखवणारी बाब आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा कितीही दावा करत असले, तरी पुण्यात व्हेंटिलेटर न मिळणं आणि त्यापेक्षा अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध न होणं हे सरकारी दाव्याचा फोलपणा उघडा पाडतं.

संबंधित बातम्या :

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.