रियादहून दिल्लीला निघालेल्या विमानात प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, कराचीत इमर्जन्सी लँडिंग

पाकिस्तानने मानवता धर्म जपत कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली. मात्र, तरीही प्रवाशाच्या जीव वाचवण्यात यश आलं नाही (Emergency landing of Indian airlines go air flight at Karachi).

रियादहून दिल्लीला निघालेल्या विमानात प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, कराचीत इमर्जन्सी लँडिंग
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:10 AM

कराची : भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातारण आहे. मात्र, या तणावाचा विचार न करता पाकिस्तानने आज भारतीय एअरलाईन्सच्या गो-एअर फ्लाइटला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली. विमानामधील एका प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यासाठी ही इमर्जन्सी लँडिंग आवश्यक होती. पाकिस्तानने मानवता धर्म जपत कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली. मात्र, तरीही प्रवाशाच्या जीव वाचवण्यात यश आलं नाही (Emergency landing of Indian airlines go air flight at Karachi).

सौदी अरेबियाच्या रियाद येथून दिल्लीच्या दिशेला हे विमान निघालं होतं. मात्र, अचानक वाटेत एका 30 वर्षीय प्रवाशाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. प्रवाशी विमानातच बेशुद्ध पडला. प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने त्यााला तातडीने उपचाराची गरज होती. या दरम्यान, पाकिस्तानच्या प्रशासनाने कराची विमानतळावर विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली.

कराची विमानतळावर डॉक्टरांनी प्रवाशाला तपासले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. विमानतळावरील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले. मृत प्रवासी उत्तर प्रदेशच्या बरेली येथीस रहिवासी आहेत. प्रवाशाला मृत घोषित केल्यानंतर विमान कराचीहून दिल्लीच्या दिशेला रवाना झालं (Emergency landing of Indian airlines go air flight at Karachi).

दरम्यान, याआधी 8 नोव्हेंबर रोजी रियाद येथून बंगळुरुला जाणाऱ्या विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग घेण्यात आली होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही लँडिंग घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं.

हेही वाचा : योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु, गाईडलाईन्स जारी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.