तेलंगणामध्ये बर्थडे केक खाल्ल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू

तेलंगणाच्या (Telangana) सिद्धपेट जिल्ह्यात वाढदिवसाचा केक (Birthday cake) खाल्ल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हा केक मृत झालेल्या रवी यांच्या भावाने पाठवलेला होता.

तेलंगणामध्ये बर्थडे केक खाल्ल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 06, 2019 | 9:12 AM

हैदराबाद : तेलंगणाच्या (Telangana) सिद्धपेट जिल्ह्यात वाढदिवसाचा केक (Birthday cake) खाल्ल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हा केक मृत झालेल्या रवी यांच्या भावाने पाठवलेला होता. त्यामुळे त्यांच्या भावावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. ही घटना जिल्ह्यातील कोमरवेल्ली मंडल अइनापूर गावात बुधवारी (4 ऑगस्ट) घडली. रवी (वय 39), रामचरण (9) असं मृत झालेल्यांची नावं आहेत.

रामचरण याचा बुधवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी रवीच्या छोट्या भावाने केक पाठवला होता. रामचरणच्या वाढदिवसानंतर रवी, रामचरण आणि त्याची आई भाग्यलक्ष्मी, बहीण पूजानेही केक खाल्ला होता. यानंतर चौघेही बेशुद्ध झाले. यावेळी स्थानिकांनी या चौघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर उपचारादरम्यान वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. तर केक खाल्लेल्या आईची तब्येत चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मृत रवीच्या भावाने केक पाठवला होता. त्यासोबतच मुलाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करावा असा मेसेज देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. पण या दोन्ही भावांमध्ये वाद होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी रवीच्या भावावर संशय व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे परिसरात सध्या शोकाकुल वातावरण आहे. केक खाल्ल्याने एकाच कुटुंबातील दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.