‘फ्रान्सप्रमाणे भारतात देवी-देवतांचं वाईट कार्टून काढलं असतं तर त्यालाही मारलं असतं’, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा दाखल

फ्रान्समध्ये झालेल्या हत्यांचं समर्थन करणं प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांना महागात पडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन उत्तर प्रदेशमधील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

'फ्रान्सप्रमाणे भारतात देवी-देवतांचं वाईट कार्टून काढलं असतं तर त्यालाही मारलं असतं', मुनव्वर राणांविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 5:29 PM

लखनौ : फ्रान्समध्ये झालेल्या हत्यांचं समर्थन करणं प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांना महागात पडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन उत्तर प्रदेशमधील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तक्रारीत मुनव्वर राणा यांचं कार्टून वादावरुन झालेल्या हत्येचं समर्थन समाजात तेढ निर्माण करणारं असल्यचं म्हटलं आहे (FIR against Shayar Munawwar Rana for comments over France cartoon killing).

मुनव्वर राणा यांचं संबंधित वक्तव्य सामाजिक सौहार्द बिघडवणारं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं हजरतगंज पोलिसांनी सांगितलं आहे.

मुनव्वर राणा यांच्या विरोधातील तक्रारीत म्हटलं आहे, “फ्रान्समधील कार्टून वादानंतर झालेल्या हत्येंचं समर्थन करणारं मुनव्वर राणा यांचं वक्तव्यं सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी पुरेसं आहे.” पोलिसांनी देखील राणा यांचं वक्तव्य दोन समुहांमध्ये द्वेष तयार करणारं आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारं असल्याचं म्हटलं. तसेच यामुळे समाजातील शांतता भंग होण्याचीही शक्यता व्यक्त केली.

मुनव्वर राणा यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153अ, 295अ, 298 आणि 505 सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त (DCP) सोमेन वर्मा म्हणाले, “मुनव्वर राणा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यात त्यांनी फ्रान्समधील हत्याकांडाला योग्य म्हटलं होतं. हे वक्तव्य सामाजिक शांतता बिघडवणारं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.”

शायर मुनव्वर राणा नेमकं काय म्हणाले होते?

मुनव्वर राणा यांना फ्रान्समधील कार्टून वादावर विचारलं असता ते म्हणाले, “जर एखाद्या व्यक्तीने माझ्या बापाचं किंवा माझ्या आईचं असं वाईट चित्र काढलं तर आम्ही त्याला मारुन टाकू. जर भारतात एखाद्या देवी-देवताचा, सीता मातेचं किंवा भगवान रामांचं असं वाईट आक्षेपार्ह कार्टून काढत असेल. ते चित्र पाहावंसं वाटत नसेल आणि डोळे बंद करावेसे वाटत असतील तर आम्ही कार्टून काढणाऱ्याला मारुन टाकू. भारतात हजारो वर्षांपासून ऑनर किलिंगला योग्य ठरवलं जात आहे. गुन्हेगारांना कोणतीही शिक्षा होत नाही. मग फ्रान्सच्या घटनेला चुकीचं कसं म्हणता? हे देखील चुकीचं आहे असं म्हणा, सर्वजण पकडले जातील. जे इथं होतंय तेच जगातही होत आहे.”

मुस्लिमांना डिवचण्यासाठी असे कार्टून काढले जात आहेत, असंही मुनव्वर राणा यांनी म्हटलं. असं असलं तरी यानंतर अन्य एका चॅनलवरील मुलाखतीत बोलताना राणा यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “मी फ्रान्समधील हिंसेला योग्य म्हटलेलं नाही. धर्म हा एक धोकादायक खेळ आहे आणि लोकांनी त्यापासून दूर राहिलं पाहिजे.”

हेही वाचा :

तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर

भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?

FIR against Shayar Munawwar Rana for comments over France cartoon killing

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.