Mahad Building Collapse | मोहम्मदची मृत्यूवर मात, 5 वर्षाचा चिमुकला 19 तासांनी ढिगाऱ्याबाहेर

महाड इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी ढिगाऱ्याखासून एका पाच वर्षीय चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. (five year old boy rescued from Mahad building collapse after 19 hours).

Mahad Building Collapse | मोहम्मदची मृत्यूवर मात, 5 वर्षाचा चिमुकला 19 तासांनी ढिगाऱ्याबाहेर
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 4:01 PM

रायगड : महाड इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी ढिगाऱ्याखासून एका पाच वर्षीय चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. या चिमुकल्याचं नाव मोहम्मद बांगी असं आहे. मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची आई नौशिन नदीम बांगी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे (five year old boy rescued from Mahad building collapse after 19 hours).

नौशिन नदीम बांगी यांचे पती परदेशी नोकरीला आहेत. नौशिन या त्यांच्या तीन लहान चिमुकल्यांसह इमारतीत वास्तव्यास होत्या. यामध्ये एक लहान मुलगा तर दोन लहान मुलींचा समावेश आहे. यापैकी मुलगा मोहम्मद आणि त्याची दोन वर्षीय लहान बहीण रुकय्या सापडले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मोहम्मदची बहीण आयशा हीचा शोध सुरु आहे (five year old boy rescued from Mahad building collapse after 19 hours).

महाड शहरातील काजळपुरा भागात सोमवारी (25 जून) पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या इमारतीच्या मलब्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 60 जणांना बाहेर काढलं असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 18 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इमारत कोसळण्याची कारणं काय?

इमारतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बेसमेंटच्या पिलरची रुंदी ही इमारतीच्या अन्य पिलरच्या रुंदी एवढीच होती. महाड शहरातील काजळ पुरा मोहल्ल्यामधील हापुस तलाव या भागामध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीच्या परिसरामध्ये दरवर्षी पुराचे पाणी वेढले जात असताना या तकलादू पिलरवर संपूर्ण इमारतीचा भार पेलणे कठीण होते. महाड शहरातील पूरस्थितीमुळे अनेक इमारती अशा पद्धतीने केवळ पिलर्सवर उभ्या असून पुराच्या पाण्यामुळे चार तासांपेक्षा अधिक काळ भिजून या पिलर्समधील स्टील गंजून कमकुवत होते. त्यावरील इमारतीचा भार सहन न झाल्याने अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते.

दोषींवर कारवाई केली जाईल – एकनाथ शिंदे

ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. शहरात ज्या जुन्या इमारती आहेत, त्यासाठी क्लस्टर योजना आणली आहे.

संबंधित बातमी : Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.