आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईंची प्रकृती चिंताजनक, कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल
तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
गुवाहाटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यानंतर गोगोई यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगोई यांच्या शरिरातील अनेक अवयव काम करत नसल्यानं त्यांना श्वसनाला त्रास होत आहे. गोगोई सध्या बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तरुण गोगोई हे कोरोनामुक्त झाले होते. (Former Assam Chief Minister Tarun Gogoi is in critical condition, admitted in GMC hospital)
तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील 48 ते 72 तास गोगोई यांच्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचं हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडली
86 वर्षांचे तरुण गोगोई हे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. 2 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर गोगोई यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
डॉक्टरांकडून औषधोपचार आणि अन्य उपचारांद्वारे गोगोई यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर डायलिसिसही केलं जाण्याची शक्यता हेमंत बिस्वा यांनी वर्तवली आहे. एम्सच्या डॉक्टर आणि GMCH ची टीम सातत्यानं आपल्या संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच गोगोई यांचा परिवारही संपर्कात आहे आणि त्यांच्या अनुमतीनेच सर्व उपचार सुरु असल्याचं हेमंत बिस्वा यांनी सांगितलं.
तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
भारतात काल दिवसभरात 45 हजार 209 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90 लाख 95 हजार 807 वर जाऊन पोहोचली आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 40 हजार 962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल दिवसभरात 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
With 45,209 new #COVID19 infections, India’s total cases rise to 90,95,807
With 501 new deaths, toll mounts to 1,33,227. Total active cases at 4,40,962
Total discharged cases at 85,21,617 with 43,493 new discharges in last 24 hrs. pic.twitter.com/jtWtREu9oK
— ANI (@ANI) November 22, 2020
संबंधित बातम्या:
दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!
Former Assam Chief Minister Tarun Gogoi is in critical condition, admitted in GMC hospital