देश लॉकडाऊन, कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जंगी विवाहसोहळा

बंगळुरु हे 'कोरोना'च्या रेड झोनमध्ये येत असल्यामुळे 'रामनगर' या ग्रीन झोन शहरातल्या फार्म हाऊसवर लग्न पार पडलं. (HD Kumaraswamy son Nikhil Wedding)

देश लॉकडाऊन, कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जंगी विवाहसोहळा
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 12:10 PM

बंगळुरु : देश ‘कोरोना’च्या संकटाशी झुंजत असताना देशभरात अनेकांनी आपापले विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुत्र असलेला अभिनेता निखिल थाटामाटात विवाहबंधनात अडकला. लग्नाच्या फोटोमध्येच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचेही चित्र दिसत आहे. (Former Karnataka CM HD Kumaraswamy son Nikhil Wedding during Corona Lockdown)

शुक्रवार 17 एप्रिलच्या मुहूर्तावर निखिलचं लग्न रेवतीसोबत करण्याचं आधीपासूनच ठरलं होतं. रेवती ही कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री एम. कृष्णाप्पा यांची नात आहे. मात्र लग्नावर ‘कोरोना’चे सावट असल्याने दोन्ही कुटुंबीय चिंतेत होते.

‘आम्हाला धुमधडाक्यात लग्न करायचं होतं, तुम्हा सर्वांना आमंत्रण द्यायचं होतं. परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला ठरलेल्या दिवशीच छोटेखानी विवाह सोहळा आखणे भाग आहे’ असं म्हणत कुमारस्वामी यांनी पाहुण्यांची माफी मागितली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना विवाहस्थळी भेट न देण्याचे आवाहन केले. घरुनच वधू-वरांना आशीर्वाद देण्याचं आवाहन कुमारस्वामी यांनी केलं.

बंगळुरु हे ‘कोरोना’च्या रेड झोनमध्ये येत असल्यामुळे ‘रामनगर’ या ग्रीन झोन शहरातल्या फार्म हाऊसवर लग्न पार पडलं. 12-13 डॉक्टरांसोबत बोलून लग्नसोहळा आयोजित केल्याचं कुमारस्वामी म्हणाले आहेत.

Former Karnataka CM HD Kumaraswamy son Nikhil Wedding during Corona Lockdown

25 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, तेव्हा 14 एप्रिलला ते संपण्याच्या आशेने कुटुंबांनी बंगळुरुत कृष्णाप्पा यांच्या घरी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने आणि बंगळुरु हॉटस्पॉट म्हणून घोषित झाल्याने त्यांना पुन्हा विवाहस्थळ बदलावे लागले, अशी माहिती जेडीयू (एस) प्रवक्ते सदानंद यांनी दिली.

दरम्यान, मी रामनगरच्या उपायुक्तांकडे अहवाल मागवला आहे, पोलिस अधीक्षकांशीही बोलत आहे. आम्हाला कारवाई करावीच लागेल, अन्यथा ही यंत्रणेची चेष्टा ठरेल, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण यांनी दिली आहे.

(Former Karnataka CM HD Kumaraswamy son Nikhil Wedding during Corona Lockdown)

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.