GHMC Election | आता फक्त डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिलेत, असदुद्दीन ओवैसींचा भाजपला खोचक टोला
प्रचाराला फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना आणायचं राहिलंय, असा खोचक टोला ओवैसींनी भाजपला लगावला आहे. Asaduddin Owaisi Donald Trump
हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि एमआयएम, तेलंगणा राष्ट्र समिती यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे नेते आल्यामुळे एमआएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. प्रचाराला फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना आणायचं राहिलंय, असा खोचक टोला ओवैसींनी भाजपला लगावला आहे. ( Asaduddin Owaisi said only Donald Trump left to came Hyderabad)
असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी एका सभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींच्या जागी देशाचा नवा पंतप्रधान निवडण्यासाठीची निवडणूक असल्यासारखं वाटतेय, असं म्हटलं. करवन येथील एका सभेत एका मुलानं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचारासाठी बोलवायला पाहिजे, असं म्हटलं होतं, यानंतर ओवैसी यांनी त्या मुलांचं खर आहे, आता फक्त डोनाल्ड ट्रम्प यांनाच बोलावयचं राहीलय, असं ओवैसी म्हणाले.
It doesn’t look like Hyderabad election, it’s as if we’re electing a PM in place of Narendra Modi. I was at a rally in Karwan & said that everyone has been called here, a child said they should’ve called Trump too. He was right, only Trump is left: Asaduddin Owaisi, AIMIM (28.11) pic.twitter.com/lmGlkXIrKz
— ANI (@ANI) November 29, 2020
जानेवारी महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत नमस्ते ट्रम्प नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावरुन विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.
भाजपचे दिग्गज नेते प्रचारात सहभागी
भाजपनं हैदराबाद महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,स्मृती इराणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात सहभाग घेतला. यामुळे टीआरएस आणि एमआयएमनं भाजपवर टीका केली आहे. ( Asaduddin Owaisi said only Donald Trump left to came Hyderabad)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शनिवारी अमित शाह यांच्या दौऱ्यावरून भाजपवर टीका केली होती. विभाजनकारी शक्तींचा हैदराबादमध्ये घुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केसीआर यांनी केला होता.
केसीआर यांची योगी आदित्यनाथांवर टीका
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये प्रचारसभा घेऊन नाव बदलण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केसीआर यांनी त्यांना फटकारलं आहे. देशात दरडोई उत्पन्नाबाबत 28 व्या क्रमांकावर असलेलं पिछाडीवरील राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवण्याचा प्रयत्न करतंय, असं म्हणत केसीआर यांनी खोचक टोला लगावला. तसेच हैदराबादमध्ये काही विभाजनवादी शक्ती शिकाव करत असल्याचं सांगत हैदराबादला वाचवा, असं आवाहन जनतेला केलं आहे. ते हैदराबादमधील एल. बी. स्टेडियमवर बोलत होते.
केसीआर म्हणाले, “काही विभाजनवादी शक्ती हैदराबादमध्ये शिरकाव करत आहेत आणि येथील शांतता बिघडवत आहेत. आपण त्यांना हे करु देणार आहोत का? आपण आपली शांतता भंग होऊ देणार आहोत का? तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून मी हैदराबादमधील जनतेला आवाहन करतो की त्यांनी पुढे यावं आणि टीआरएस या पुरोगामी विचाराच्या पक्षाला पाठिंबा द्यावा. हैदराबादला विभाजनवादी पक्षांपासून वाचवा.”, असं आवाहन केसीआर यांनी केलेय.
संबंधित बातम्या :
एकदा भाजपला संधी द्या, हैदराबादमधील सगळी बेकायदेशीर कामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही : अमित शाह
तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा
( Asaduddin Owaisi said only Donald Trump left to came Hyderabad)