Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं (Corona Patient Medicine) आहे.

Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 8:50 AM

नवी मुंबई : गेल्या काहीदिवसांपासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूवर अखेर औषध मिळालेलं (Corona Patient Medicine) आहे. नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणांवर औषध तयार केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाला भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) यांनीही परवानगी दिली आहे.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही लस सापडलेली नाही. तोवर उपलब्ध असणाऱ्या काही औषधांच्या मिश्रणातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. याचदरम्यान आता नवी मुंबई तळोजा MIDC मधील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी अँटिव्हायरल औषध फेविपिरावीरला फैबि फ्लू नावाने पुढे आणलं आहे. शनिवारी याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली.

भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) ने या औषधाच्या निर्मितीसाठी आणि मार्केटिंगसाठी परवानगी दिली आहे. फैबि फ्लू हे औषध कोविड 19 रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

“ही मान्यता आम्हाला त्यावेळी मिळाली आहे जेव्हा भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारताची आरोग्य व्यवस्था प्रचंड दबावाखाली आहे. फैबि फ्लू या प्रभावी औषधाच्या उपचारामुळे हा तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत क्लिनिकल चाचणीत फैबि फ्लूने कोरोना व्हायरसच्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचा निकाल दिला आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे. कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायासोबत एकत्रितपणे काम करणार त्यामुळे देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 103 रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत बाजारात उपलब्ध होईल”, असं ग्लेनमार्क फार्मास्युटिल्सचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहोचली आहे. तर 5893 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. 62 हजार 773 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्यात 30 माकडांवर कोरोना लसची चाचणी होणार : वनमंत्री संजय राठोड

कोरोनामुळे हेही घडतंय, कोरोना लसचा फॉर्म्युला चोरीला जाण्याची भीती, गुप्तहेर संशोधनाच्या मागावर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.