AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोवा कोरोनामुक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

आतापर्यंत 23 राज्य/ केंद्रशासित प्रदेशांतील अन्य 54 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळलेला (Goa State Corona Free) नाही.

गोवा कोरोनामुक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
| Updated on: Apr 19, 2020 | 7:30 PM
Share

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 15 हजार 712 वर पोहोचला (Goa State Corona Free) आहे. तर देशात आतापर्यंत 507 मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे 2 हजार 231 लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

“कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नुकतंच केंद्रीय (Goa State Corona Free) गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोनाशी आपला संघर्ष सुरू राहणार असून लॉकडाऊन आणि इतर मार्गदर्शक तत्वांचे प्रामाणिकपणे पालन करणे गरजेचे आहे असे अमित शाहांनी सांगितले

हॉटस्पॉट, क्लस्टर आणि क्षेत्रबंदीमध्ये समाविष्ट नसलेल्या भागांनीही, जेथे लॉकडाउनमधून मुभा देण्यात आली आहे, अशा भागांनीही दक्ष राहिले पाहिजे,” असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

“समुदायांच्या चाचण्या करणाऱ्या वैद्यकीय पथकांना राज्यांनी पुरेशी सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. स्थलांतरित मजुरांना त्याच राज्य/ केंद्रशासित प्रदेशात, संमत व्यवसायांमध्ये कामावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवास करण्यासाठी गृह मंत्रालयाने SOP म्हणजेच प्रमाणित कृती प्रक्रिया जारी केली आहे,” असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

भारतातील गोवा राज्य कोरोनामुक्त

“गेल्या 28 दिवसांत गोवा, माहे (पुदुचेरी) आणि कोडाग्गू / कुर्ग (कर्नाटक) या राज्यात कोविडचा एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. यासोबतच, 23 राज्य/ केंद्रशासित प्रदेशांतील अन्य 54 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

औषधे व लसींच्या चाचण्यांसंदर्भात काम करण्यासाठी एका उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. लस बनवण्याबाबत सर्व मंत्रालयांकडून सुरु असलेल्या कामामधील समन्वयाला हे कृती दल गती देईल,” असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

पंतप्रधानांनी उल्लेख केल्याप्रमाणे येत्या 20 एप्रिलपासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून, क्षेत्रबंदी नसलेल्या भागांमध्ये निवडक बाबींत मुभा देण्यात येईल. मात्र हॉटस्पॉट जिल्ह्यांतील भागांत कोणतीही सवलती/ मुभा दिली जाणार नाही.

स्थानिक गरजांनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमांपेक्षा जास्त कठोर निर्बंध लागू करू शकतात. हॉटस्पॉट म्हणजे कोविड 19 चा मोठा प्रादुर्भाव झालेले भाग किंवा बऱ्यापैकी संसर्ग झालेले क्लस्टर्स आहे. हॉटस्पॉटच्या अंतर्गत भागात, कोविड 2019 च्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, क्षेत्रबंदीचे भाग आणि बफर झोन यांच्या सीमा ठरविते, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले

जेथे निवडक मुभा दिलेल्या आहेत अशा भागांत, सध्याच्या लॉकडाउनच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची खबरदारी राज्यांनी व जिल्ह्यांनी घ्यावयाची आहे. तसेच SOP नुसार व्यक्ती-व्यक्तींदरम्यान उचित सामाजिक अंतर राखण्यासाठी उपाय करण्याचीही काळजी त्यांनी घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

3 मेपर्यंत ‘या’वर देशभरात बंदी

  • प्रवासी वाहतूक
  • शैक्षणिक संस्था
  • औद्योगिक/ व्यावसायिक कामकाज (वगळले नसल्यास) चित्रपटगृहे, मॉल्स
  • सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम
  • धार्मिक प्रार्थनास्थळे
  • टॅक्सी आणि कॅब ऍग्रीगेटर्स

ज्या भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्या भागात सेवा पुन्हा सुरू करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. कोणत्याही नव्या रुग्णांची भर पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशात 755 कोविड रुग्णालय

मुभा देण्याचे निकष गतिशील आहेत; या भागांत कोविड2019 चे नवीन रुग्ण सापडले, तर हेही ‘रेड झोन’ आणि क्षेत्रबंदीच्या भागांमध्ये समाविष्ट होतील. जेथे लॉकडाऊनच्या उपायांची कठोर अंमलबजावणी होत असेल.

देशात सध्या समर्पित कोविड रुग्णालयांची संख्या 755 झाली आहे. तर समर्पित कोविड आरोग्य केंद्रांची संख्या 1 हजार 389 आहे. त्यामुळे आता आपल्याकडे 2 हजार 144 समर्पित सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी तीव्र लक्षणे असलेल्या/अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करता येणार आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे

विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागांत, संसर्गाला अडथळा आणण्यासाठी, मास्क व चेहऱ्याची आच्छादने उपयोगी पडतील. याबाबत मार्गदर्शक सूचना अगोदरच जारी केल्या आहेत. सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे गृहमंत्रालयाने यापूर्वीच सांगितले आहे

कोरोनावर लस विकसित करण्यासाठी 17 गट काम करत आहेत. यातील 5 गटांनी प्राण्यांवरील अभ्यासाचा टप्पा पूर्ण केला असून मानवावरील परिणाम तपासून पाहात आहेत.

यातील एक ऑक्सफॉर्ड गट हा कोरोनावर लस विकसित काम करत आहे. या गटाने केलेल्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करण्यात येईल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट (Goa State Corona Free) केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.