Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…

सराफा बाजारात मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळत (Gold Rate Increase) आहे.

Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर...
दोन ते तीन महिन्यांआधी सोनं 56000 प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचलं होतं. पण आता हा आकडा घसरत 52000 प्रति 10 ग्रामपर्यंत आला आहे.
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 12:17 PM

मुंबई : सराफा बाजारात मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळत (Gold Rate Increase) आहे. कारण गेल्या 24 तासात सोन्याचा भाव तब्बल 3 हजार रुपयांनी वाढला आहे. मुंबईतील सोन्याचा भाव 54 हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा इतका आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. मात्र सराफ बाजारात तेजी पाहायला मिळत (Gold Rate Increase) आहे.

सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पुण्यात सोन्याचे आजचे दर 54 हजार तोळ्यापर्यंत गेले आहेत. तर चांदीचे दर 70 हजार किलोपर्यंत पोहोचले आहेत.

गेल्या दीड वर्षातील सोन्याची सर्वात मोठी दरवाढ आहे, तर गेल्या चार महिन्यात चांदीचे दर दुप्पट झाले असल्याची माहिती रांका ज्वेलसर्च संचालक वस्तूपाल रांका यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोने चांदीचे दरवाढीवर परिणाम होत असल्याचंही वस्तूपाल रांका यांनी सांगितले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सोन्याच्या दरात मागील महिनाभरापासून सोन्याचे दर सातत्याने वाढतच आहेत. महिनाभरात प्रतितोळा सोन्याच्या किमतीत 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 9 जून रोजी 46,800 रुपयांवर असलेले सोने 11 जून रोजी 47,200, तर 15 जून रोजी 47,800 रुपयावर पोहचले होते. आता आज (22 जुलै) सोन्याचे दर 51 हजार 100 वर पोहचले आहेत. 17 जून रोजी सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र, भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम होऊन 20 जून रोजी सोन्याच्या भावात थेट 700 रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी ते 48 हजार 700 रुपयांवर पोहचले होते.

मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या दरात विलक्षण वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ होत असल्याने यामागील कारणांचं देखील विश्लेषण होतंय. मात्र, वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरु असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते. लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरु झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Gold Rate | सोने दराची घोडदौड, सोन्याचं अर्धशतक, GST सह सोन्याचा भाव…

जगभरात आर्थिक मंदीचं सावट, सोन्याचे भाव वाढतेच, तर चांदीच्या किमतीत घट

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.