ST WORKER STRIKE : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? पगार वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव-सूत्र
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत एसटी कर्माचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.
सरकारचा नेमका प्रस्ताव काय?
- एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा प्रस्ताव
- किमान 5 हजार ते कमाल 21 हजार वेतन देण्याबाबत विचार
- कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार
- महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगाराची हमी
- प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या आधी पगार देणार
- ज्यांचं वेतन 50 हजारांहून जास्त त्यांना कमी वेतनवाढ
एसटीच्या विलीनीकरणावरून राजकारण तापलं
एसटीच्या विलीनीकरणावरून सध्या जोरदार राजकारण तापलंय. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतेय, तर इतर महामंडळांचंही विलीनीकरण लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे त्यावर बोलणार नाही असंही शरद पवार म्हणाले.
बैठकांचा सपाटा तरीही तोडगा नाही
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्य सरकार आणि कर्मचारी तसेच विरोधी पक्षातील नेते यांच्यात बैठका सुरू आहेत. यात भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलनात उतरलेत. आंदोलनावरून भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. सरकारकडूनही लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय, मात्र गेल्या 15 दिवसांपासून उघड्यावर कडाक्याच्या थंडीत आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे.