PHOTO : राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना सायकल वाटप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज मुंबईतील डबेवाल्यांना सायकल वाटप करण्यात आलं. (Governor Bhagat Singh Koshyari Distribute Bicycle To Dabbawala)
Follow us
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज मुंबईतील डबेवाल्यांना सायकल वाटप करण्यात आलं.
राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील 12 निवडक डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोरोना काळात अनेक डब्बेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या आहे. त्यामुळे त्यांचा रोजगारही गेला.
या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा रोजगार मिळावा यामुळे साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.
आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून गाडी आणि विमानाने फिरतील असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.