Army helicopter crash : तामिळनाडूतील लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
तामिळनाडूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. यापैकी माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी जखमी झाले असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत वरुण सिंह हे 80 टक्के भाजले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शौर्य चक्र देऊन वरुण सिंह यांचा सन्मान
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरुण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. 2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते
तामिळनाडूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. यापैकी माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले
धुके आणि खराब हवामानामुळे IAF चे Mi-17VH हेलिकॉप्टर क्रॅश झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई दलाच्या तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. भारतीय लष्कराचे Mi-17V5 हे सर्वात सुरक्षित हेलिकॉप्टरपैकी एक आहे. हे विमान कोणत्याही व्हीव्हीआयपी दौऱ्यात वापरले जाते. हे दुहेरी इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, ज्यामुळे एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या इंजिनच्या मदतीने सुरक्षित लँडिंग करता येते. (Group Captain Varun Singh seriously injured in a military helicopter crash in Tamil Nadu)
संबंधित बातम्या
Rip cds bipin rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव उद्या दिल्लीत आणणार, देश शोकाकूल