गुजरातमध्ये अतिवृष्टी… 15 जणांचा मृत्यू तर 11 हजार लोकांचं स्थलांतर, 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Gujrat Heavy Rain Update : गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरु आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या मुसळधार पावसामुळे15 जणांचा मृत्यू झालाय. तर 11 हजारांहून अधिक लोकांचं स्थलांतर करावं लागलं आहे. वाचा सविस्तर...

गुजरातमध्ये अतिवृष्टी... 15 जणांचा मृत्यू तर 11 हजार लोकांचं स्थलांतर, 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट
गुजरातमध्ये जोरदार पाऊसImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 10:29 AM

गुजरातमध्ये सध्या अतिवृष्टी होत आहे. मागच्या 48 तासात मुसळधार पाऊस गुजरातमध्ये झाला आहे. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. ठिकठिकाणी पाणी साचलं. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. तर काहींच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कोसळत असलेल्या तुफान पावसामुळे हवामान खात्याकडून 27 जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या हवामान विभागाने 27 जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात दिला आहे.

गुजरातमध्ये तुफान पाऊस

गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झालेत. नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. अशात सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. जामनगर ते जुनागड, वडोदरा ते बनासकांठापर्यंत आणि अरावली ते अहमदाबादपर्यंत तुफान पाऊस झाला. हा सगळा परिसर जलमय झाला आहे. उच्चभ्रू वस्तीतील घरं देखील पाण्याखाली गेली आहेत.

गुजरातच्या वडोदरामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत आहे. ज्या रस्त्यांवरून गाड्या धावायच्या त्या रस्त्यावर आज कित्येक फूट पाणी आहे. रस्त्यांवरच्या साचलेल्या पाण्यामुळे शहराच्या वेगाला ब्रेक लागला आहे. गुजरातमधील या तुफान पावसामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 15 जणांचा मृत्यू या पावसामुळे झालाय. तर 11 हजारांच्या पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. ज्या भागात लोक अडकले आहेत. त्या ठिकाणी रेक्स्यू ऑपरेशन सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

विश्वामित्र नदीने धोका पातळी ओलांडली

वडोदरामधल्या आजवा सरोवरातून विश्वामित्र नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे विश्वामित्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. धोका पातळीच्यावर 8 फुटांवरून ही नदी वाहते आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातल्या चार हजारहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अशातच हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.