Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

केस पातळ होत असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील, तर त्याआधी केस पातळ होण्यामागची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 6:43 PM

मुंबई : दाट केस हे आपल्या सर्वांचेच स्वप्न असते. त्याप्रमाणेच प्रत्येकालाच काहीना काही केसांची समस्या देखील असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेतली जात नाही. त्यामुळे सर्वात मोठी केसांच्या बाबतीतील समस्या उद्भवते ती म्हणजे केस विरळ होणे. सततच्या गळतीमुळे हळूहळू केस पातळ होत जातात. अनेक उपाय करूनही यावर फरक पडत नाही. याची नेमकी कारणे काय हे देखील आपल्याला कळत नाही. आपण वेगवेगळे अंदाज बांधत राहातो. मात्र, रोजच्या जीवनातल्या आपल्या छोट्या चुकाच याला कारणीभूत असतात (Hair care hair Loss and thin reasons).

बऱ्याचदा केस घनदाट आणि लांबसडक करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. अशावेळी जर तुमचे केस पातळ होत असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील, तर त्याआधी केस पातळ होण्यामागची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. तरच त्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात.

तेलाचा अति वापर

बऱ्याचदा केसांच्या आरोग्यासाठी आपण विविध तेलांचा वापर करतो. परंतु, तेल वापरताना ते योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे असटे. केसांच्या वाढीसाठी जर सतत तेल लावत असाल तर ते चुकीचे आहे. सतत तेल लावल्याने स्काल्पचे पोअर्स बंद होतात आणि केस वाढण्याऐवजी केसांची वाढ थांबते. तसेच बंद पोअर्समध्ये तेल साठून राहते आणि त्यावर प्रदूषणामुळे धूळही साचून राहाते. यामुळे केस तुटण्याची आणि पातळ होण्याची समस्या वाढीला लागते ( Hair care hair Loss and thin reasons).

ओले केस विंचरणे

बऱ्याचदा घाईघाईत आपण ओले केस विंचरतो. केस पातळ होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ओले केस विंचरल्याने ते अधिक तुटतात. त्यासाठी तुम्ही केस ओले असताना ते हाताच्या बोटांनी मोकळे करा त्यानंतर टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर थोडे सुकू द्या. सुकल्यावरच केसांवरून कंगवा फिरवा.

केस रगडून धुणे

केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. केसांना आठवड्यातून  तीन वेळा शँपू आणि कंडिशनर हे करायलाच हवे. पण हे करत असातना केसांची काळजी घेणे गरजेचे असते. शँपू लावल्यानंतर केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तर, केसांना योग्य पोषण मिळते (Hair care hair Loss and thin reasons).

केसांवर ‘हिट’चा वापर

बऱ्याचदा बाहेर किंवा कार्यक्रमांना जाताना आपण ‘स्ट्रेटनर’ अथवा ‘ड्रायर’ सारख्या उपकरणांचा केसांवर वापर करतो. पण केसांना अशा तऱ्हेने सतत हिट देणेही चुकीचे ठरटे. केस चांगले राहावे यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. सतत ड्रायरचा वापर केल्याने त्या हिटमुळे केस गळती सुरू होऊन, केस पातळ होतात.

ताणताणाव

सतत काम आणि ऑफिस या सगळ्यामध्ये आपण तणावात असतो. पण हाच तणाव आपले केस पातळ करण्यासाठी कारणीभूत ठरतो. बऱ्याच गोष्ट तणावामुळे बिघडत असतात. त्यामुळे शक्यतो तणाव न घेणेच शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे नेहमी शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

(Hair care hair Loss and thin reasons)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.