क्राईम पेट्रोल पाहून संशय घेणाऱ्या पत्नीचा वैताग, पतीकडून घटस्फोटाची मागणी

लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरुन भांडणं होत (couple divorce due to crime petrol serial) असतात.

क्राईम पेट्रोल पाहून संशय घेणाऱ्या पत्नीचा वैताग, पतीकडून घटस्फोटाची मागणी
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 7:23 AM

चंदीगड : लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरुन भांडणं होत (couple divorce due to crime petrol serial) असतात. आतापर्यंत दारु पिण्याची सवय, विवाहबाह्य संबंध इतर कारणांमुळे अनेकांचे घटस्फोट झाले आहेत. पण आता मोबाईल आणि सीरियल बघत असल्यामुळेही घटस्फोट होत असल्याचे समोर (couple divorce due to crime petrol serial) आलं आहे.

हरियाणामध्ये एक महिला दररोज क्राइम पेट्रोल पाहत असल्यामुळे तिच्या पतीने कोर्टात घटस्फोटाची मागणी केली आहे. ही महिला क्राइम पेट्रोल बघून सतत आपल्या पतीवर संशय घेते, असा आरोप तिच्या पतीने केला आहे.

“आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले आहे. पत्नीला क्राइम पेट्रोल पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ती मनोरुग्ण झाली आहे. ती सतत माझ्यावर संशय घेते. एकदम सीरियस होऊन माझ्याकडे रागात बघते. एकदिवस मी तिला म्हटलं असं पाहिलं तर मी मारेन. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली आणि तिथे सांगितले की, मी तिला मारले”, असं महिलेच्या पतीने सांगितले.

“माझे सासू-सासरे पैसे वाले आहेत आणि त्यांना याचा खूप गर्व आहे. माझा 9 वर्षाचा मुलगा जेव्हा त्याच्या आजीसोबत खेळतो तर त्याला पत्नी खेळून देत नाही. लग्न मोडू नये म्हणून पंचायतीपर्यंत गेलो. पण आता मर्यादेच्या बाहेर घटना घडत आहेत. त्यामुळे मला घटस्फोट हवा”, असंही पतीने सांगितले.

“हो मी सीरियल बघते. पण संशय घेण्याचे कारण सीरियल नसून माझे पती आहेत. तीन वर्ष झाले त्यांनी माझ्यासोबत वेळ घालवला नाही. गेम खेळण्यासाठी रात्रीचे बाहेर असतात. तिथूनच ते दुकानात जातात. त्यांची एक वेगळी रुम आहे. ज्यामध्ये ते मला जाऊन देत नाहीत. अशामध्ये संशय येणारच ना”, असं पत्नीने प्रोटेक्शन अधिकाऱ्यांना सांगितले.

“दोघांनाही समजवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण त्यानंतर याचा निर्णय कोर्टात होईल”, असं प्रोटेक्शन अधिकारी रजनी गुप्ता यांनी सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.