Photos: हैद्राबादमध्ये पावसाचा प्रकोप, ‘जल प्रलयात’ 13 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसाने हैद्राबाद आणि उपनगर भागात हाहाकार माजवल्याचं समोर आलं आहे.
मुसळधार पावसाने हैद्राबाद आणि उपनगर भागात हाहाकार माजवल्याचं समोर आलं आहे. या पावसामुळे बुधवारी (14 ऑक्टोबर) देखील शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं दिसलं. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कुठे गाड्यांवर झाडं पडली, तर कुठे पार्क केलेल्या गाड्या साठलेल्या पाण्यात बुडाल्या. जोरदार पावसामुळे ठिकाठिकाणी अपघातही झाले. यात जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला.