घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, फ्लोटिंग रेट बँक गृह कर्जाला रेपो दराशी संलग्नित करण्यात आले आहे. नव्या संरचनेनुसार, कर्जदारांना व्याज दरातील कपातीचा प्रत्यक्ष लाभ घेणे शक्य ठरते.

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?
गृह कर्ज की होम फायनान्स?
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 9:41 PM

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्थांनी ठेवींच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्याज दरात फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. वित्तीय संस्थांच्या कर्ज दरात घटीचे चित्र आहे. तुम्हाला स्वत: च्या हक्काचा निवारा उभारण्यासाठी अर्थसहाय्याची आवश्यकता भासते. बँक किंवा होम फायनान्स कंपनी (एचएफसी) यापैकी एक पर्याय निवडावा लागतो. गृह कर्ज दीर्घकाळासाठीची प्रक्रिया असल्याने अभ्यासपूर्वक निवड अत्यंत महत्वपूर्ण ठरते.

गृह कर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, फ्लोटिंग रेट बँक गृह कर्जाला रेपो दराशी संलग्नित करण्यात आले आहे. नव्या संरचनेनुसार, कर्जदारांना व्याज दरातील कपातीचा प्रत्यक्ष लाभ घेणे शक्य ठरते. पीएलआर म्हणजे प्राइम लेंडिंग रेट. एचएफसीचा व्याजदर हा पीएलआरसोबत संलग्नित आहे. पीएलआर हा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा अंतर्गत बेंचमार्क रेट असतो. तो वेगवेगळ्या वित्तसंस्थांचा वेगवेगळा असतो. या रेटवरच ग्राहकाला देण्यात येणाऱ्या गृहकर्जाचा दर कोणता ठेवायचा, याचा निर्णय घेण्यात येतो.

प्राथमिक टप्प्यावर समान दर

बँक किंवा एचएफसी प्राथमिक टप्प्यावर समान व्याज दर प्रदान करतात. बँका रेपो दर आणि एचएफसी पीएलआरच्या आधारावर व्याज दर निर्धारित करतात. मात्र, ग्राहकांना बँकापेक्षा एचएफसीला अधिक देय करावे लागेल. अलीकडच्या काळात आरबीआयच्या दर धोरणांच्या थेट प्रभाव बँकांच्या व्याज दरावर दिसून आला होता.

व्याज दराची तुलना

महिना HFC- PLR MCLR -बँक

नोव्हें-17 16.15 7.95 नोव्हें-18 16.75 8.50 नोव्हें-19 16.85 8.00 नोव्हें-20 16.40 7.00 नोव्हें-21 16.05 7.00

उदाहरणार्थ, A ग्राहकाने 20 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज 9 टक्के दराने एचएफसीकडून घेतले. एचएफसीने पीएलआर 16.15 टक्के असताना 9 टक्के व्याज दर आकारला. एचएफसीने 7.15 टक्के पीएलआरची सवलत प्रदान केली.

B ग्राहकाने समान कालावधीसाठी समान रकमेवर 9 टक्के व्याज दराने कर्ज घेतले. बँकेने 7.95 टक्क्याच्या एमसीएलआर वर 1.05 टक्के मार्क-अप आकारले. दोघांनी 44,986.30 रुपयांचा ईएमआय अदा करण्यास सहमती दर्शविली.

तुलना कालावधीची

कालावधीच्या अनुषंगाने विचार केल्यास, बँकेच्या ग्राहकांना एचएफसीतून कर्ज घेणाऱ्यांपेक्षा अधिक लाभ प्राप्त झाला. बँकेच्या कर्ज दराचे मापदंड बाह्य घटकांवर आधारीत आहेत. एचएफसीतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बँकेसापेक्ष 27 ईएमआय अधिक अदा करावे लागले.

इतर बातम्या

साखरेचं अर्थचक्र: उत्तरप्रदेशात घट, महाराष्ट्रात वाढ; देशात 115 लाख टन साखर उत्पादन

ई-श्रम पोर्टल : शेतमजूर ते रिक्षाचालक नोंदणी; सर्व माहिती एका क्लिकवर

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.