Operation Lotus | राजस्थानमध्ये पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? गहलोतांच्या टार्गेटवर कोण?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यास सांगितलं आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केलाय (Home Minister Amit Shah trying to Fall Rajasthan Government CM Ashok Gehlot allege).
मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, “एक काळ होता जेव्हा भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. आज देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत आणि ते इतर पक्षांची सरकारं पाडत आहेत. अमित शाह यांच्या भेटीनंतर काँग्रेस आमदारांनी अमित शाह यांना देशाचे गृहमंत्री म्हणून पाहताना लाज वाटते, अशी भावना व्यक्त केली.”
‘5 सरकारं पाडलीच हे माझ्यासाठी भूषण, आता सहावं पाडत आहे : अमित शाह’
“काँग्रेस आमदारांसोबत झालेल्या बैठकीत भाजपने त्यांना राजस्थान सरकार पाडण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अमित शाह म्हणाले मी 5 वेगवेगळे सरकारं पाडली आहेत आणि आता राजस्थानचं सरकार पाडत आहे. हे माझ्यासाठी भूषणावह आहे,” असा दावा अशोक गहलोत यांनी केलाय. अमित शाह यांनी काँग्रेस आमदारांसोबत 1 तास चर्चा केली. भाजप अजूनही राजस्थान सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असाही आरोप गहलोत यांनी केला.
भाजपच्या तोंडाला रक्त लागलंय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सहभाग : अशोक गहलोत
याआधी देखील अशोक गहलोत यांनी भाजपवर राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला होता.
अशोक गहलोत म्हणाले होते, “भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचं गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.”
संबंधित बातम्या :
अशोक गहलोतांनी वापरलेल्या शब्दांनी दु:ख, पायलटांची प्रतिक्रिया, गहलोत म्हणतात, जे झालं तो इतिहास
राजस्थान सरकार कृषी कायद्यांविरोधात विधेयक आणणार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांंची घोषणा
व्हिडीओ पाहा :
Home Minister Amit Shah trying to Fall Rajasthan Government CM Ashok Gehlot allege