पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती

पुण्यात आजपासून सायंकाळी 7 नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली (Hotel Parcel Service Pune).

पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 8:25 AM

पुणे : पुण्यात आजपासून सायंकाळी 7 नंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली (Hotel Parcel Service Pune). या निर्णयामुळे आता पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे (Hotel Parcel Service Pune).

पार्सल सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी सायंकाळी 7 वाजता हॉटेल बंद करण्याची आता आवश्यकता नाही, तर ते रात्री 10 पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवू शकतील, असं पालिकेने सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या पार्सल सेवेत वाढ करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

“हॉटेल, रेस्टॉरंटमधून सध्या पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण तेवढी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिाकंना यातून उत्पन्न मिळत नाही. मुंबईसह राज्यात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिकांचे संसार अवलंबून आहेत. तसेच फिरतीवर असलेल्या नागरिकांसाठी रेस्टॉरंटमधील जेवण गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात हॉटेल पूर्णपणे बंद होती. त्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात रेस्टॉरंट जेवणासाठी खुली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करावी, अन्यथा 40 टक्के रेस्टॉरंट बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे”, असं आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यवसायांना संध्याकाळी 7 पर्यंतच पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या वेळेत आता वाढ करुन ती रात्री 10 पर्यंत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Pune Hotels | कोरोना प्रादुर्भाव पाहता पुणे-पिंपरीत हॉटेल्स सुरु होणार नाहीत

Pune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.