विवाह्यबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप
दुबईमध्ये एदुबका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली (Husband kill wife Dubai) आहे.
अबुधाबी (यूएई) : दुबईमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची विवाहबाह्य प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा दुबईतील कोर्टाने सुनावली (Husband kill wife Dubai) आहे. गेल्यावर्षी 9 सप्टेंबरला आरोपी पती युगेश सी. एस. ने पत्नी विद्या चंद्रनची ऑफिसच्या पार्किंग भागात दिवसा ढवळ्या चाकूने हत्या केली होती (Husband kill wife Dubai), असे वृत्त गल्फ न्यूज (Gulf News) यांनी दिले आहे.
पत्नीची हत्या केल्या प्रकरणी दुबई कोर्टात खटला सुरु होता. आरोपी युगेशला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. युगेश एक वर्षापासून पत्नीवर अत्याचार करत होता, असा आरोप युगेशच्या पत्नीच्या कुटुंबियांनी केला आहे.
“मला संशय होता की माझ्या पत्नीचे कुणासोबत तरी प्रेमसंबंध आहेत”, असं युगेशने पोलिसांना सांगितले.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
केरळमध्ये राहणारी विद्या ओणम साजरा करण्यासाठी आपल्या मुलांसह भारतात परतणार होती. पण त्यापूर्वीच तिच्या पतीने तिची हत्या केली.
“विद्याच्या पतीने बऱ्याचदा विद्याला कॉल केला होता. पण विद्याने एकही फोन उचलला नाही”, असं विद्याच्या मॅनेजरने सांगितले.
त्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला विद्याची माहिती काढण्यास सांगितली. जेव्हा मॅनेजरने बाहेर येऊन पाहिले तर विद्याची चाकू मारुन हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हत्या झाल्याच्या दिवशीच पती युगेशला पोलिसांनी अटक केली.
संबंधित बातम्या :
भूतबाधा उतरवण्यासाठी अल्पवयीन तरुणाची दांडक्याने मारहाण, वडील-आजीचा मृत्यू