67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

विविध देशांचे 67 राजदूत आज भारत दौऱ्यावर आहेत आणि ते भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहे.

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार
Bharat Biotech covaxin
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 9:12 AM

हैदराबाद: भारत बायोटेक या पूर्ण स्वदेशी कंपनीनं आपल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशांचे 67 राजदूत आज भारत दौऱ्यावर आहेत आणि ते भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहे. भारत बायोटेक ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोरोना लस बनवत आहे. ही लस अन्य देशांनाही पुरवली जाणार आहे.(Ambassadors of 67 countries will visit Bharat Biotech today)

परराष्ट्र मंत्रालयाने ही भेट आयोजित केली आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांनी एका दिवसात अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूला भेट देत कोरोना लसीचा आढावा घेतला होता. त्यानंतर कोरोना लसीच्या पुढील प्रक्रियेला गती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळीच काही अनेक देशांचे राजदूत कोरोना लस निर्मिती केंद्राला भेट देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज 67 देशांचे राजदूत भारत बायोटेकला भेट देणार आहेत.

कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती?

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी देशभरातील 22 ठिकाणी केली जात आहे. जवळपास 22 ठिकाणच्या 26 हजार स्वंयसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. या लसीची साठवणूक करण्यासाठी 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे. भारत बायोटेकने अद्याप कोरोना लसीची किंमत नेमकी किती असेल, याची कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र कोव्हॅक्सिनची किंमत ही 100 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन या लसीला विकसित करण्यासाठी आणि उत्पादन सुविधेसाठी जवळपास 300-400 कोटींची गुंतवणूक केली आहे. भारत बायोटेक या कंपनींचा लस बनवण्याचा इतिहास फार उत्तम आहे. जगभरात याचे 400 पेटेंट आहेत. या कंपनीने आतापर्यंत 16 लसी विकसित केल्या आहेत.

लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज

अमेरिकन औषधी कंपनी फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ पाठोपाठ हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. 7 डिसेंबरला भारत बायोटेक या कंपनीने केंद्रीय औषधी नियामक अर्ज केला आहे. भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) सोबत मिळून स्वदेशी कोरोना लस विकसित करत आहे.

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन

भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरणासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या:

COVID-19 Vaccine Emergency Usage | भारतात ऑक्सफर्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळणार की नाही?, दोन आठवड्यात निर्णय

मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार

‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण

Ambassadors of 67 countries will visit Bharat Biotech today

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.