BREAKING | हैदराबाद डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर
पोलिस चारही आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निमिती करत होते, मात्र तपासादरम्यान पोलिसांच्या तावडीतून चौघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
हैदराबाद : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी चकमकीत ठार (Hyderabad Rape and Murder Accuse Encounter) झाले आहेत. आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू या चौघा आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी काल मध्यरात्री एन्काऊंटर केला. तपासादरम्यान पळून जात असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवला होता.
हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली.
4 accused in Hyderabad rape-murder case killed in crossfire in wee hours today: Cyberabad Police Commissioner V C Sajjanar
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2019
[svt-event title=”पीडितेला न्याय मिळाला – खासदार नवनीत राणा” date=”06/12/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ]
हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन, आरोपींना शिक्षा झाल्यामुळे बलात्कार पीडितेला न्याय मिळाला असं समजते, परंतु भविष्यात जलद गतीने न्यायव्यवस्था व्हावी, यासाठी संसद भवनात प्रश्न उपस्थित करणार, खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया https://t.co/qUIOTgJBEe pic.twitter.com/xSyKEpBmVD
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सगळ्याच बलात्काराच्या केसेस मध्ये हीच शिक्षा द्या – निलेश राणे” date=”06/12/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ]
ह्याला म्हणतात न्याय अश्या हरामखोरांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे, कोपर्डीची घटना पण अशीच होती पण ते हरामी आज ही सरकारचं खातायत. सगळ्याच बलात्काराच्या केसेस मध्ये हीच शिक्षा झाली पाहिजे. pic.twitter.com/3qOHQbJgHM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पोलिस कायदा हातात घेण्याची भीती – उज्ज्वल निकम” date=”06/12/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पोलिस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QsaU2cjgV4
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”एक आई म्हणून समाधान – भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ” date=”06/12/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] समाजमनाची हीचं मागणी होती तेच झालं,दिल्लीची,कोपर्डीची निर्भया,नयना पुजारी व अशा किती निष्पाप जिवांचा बळी घेतला आज ही त्यांच्या आईवडीलांच्या डोळ्यातले पाणी खळत नाही तेव्हाही नराधमांना असेचं ठोकले असते तर पुनरावृत्ती टळली असती.एक आई म्हणून हैदराबाद कारवाईचे समर्थनचं, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया [/svt-event]
[svt-event title=”अभिनेत्री दीपाली सय्यदची प्रतिक्रिया” date=”06/12/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | बलात्कार प्रकरणातील कायदे आणखी कठोर व्हायला हवेत : अभिनेत्री दीपाली सय्यद https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/yYnutXgn4n
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”माजी पोलिस अधिकारी सुधाकर सुराडकरांची प्रतिक्रिया” date=”06/12/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | चकमक 90 टक्के बनावट वाटते, चार आरोपींना एकाच वेळी कसं नेलं? चकमक खरी असेल तर पाठिंबा, मात्र बनावट असेल तर निषेध : माजी पोलिस अधिकारी सुधाकर सुराडकर https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/vLbx1ygPH5
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”फाशी व्हायला हवी होती, चकमक नको” date=”06/12/2019,9:04AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | द्विधा मनस्थिती, बलात्कारी ठार झाल्याचा आनंद, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती, एन्काऊंटर करण्याची पद्धत चुकीची : अंजली दमानिया https://t.co/eIKj4Eop7R @anjali_damania pic.twitter.com/qdSguWUi7D
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”प्रणिती शिंदेंकडून पोलिसांचं कौतुक” date=”06/12/2019,9:03AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | हैदाराबाद पोलिसांचं अभिनंदन : आमदार प्रणिती शिंदे https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/MdIoGNBPay
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”‘निर्भया’च्या आईकडून समाधान व्यक्त” date=”06/12/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | पीडितेच्या कुटुंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला, आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही, याचं समाधान, ‘निर्भया’च्या आईची प्रतिक्रिया https://t.co/eIKj4Eop7R #DishaCase #EncounterNight pic.twitter.com/ML5yQ5Akhv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया” date=”06/12/2019,8:41AM” class=”svt-cd-green” ]
Father of the woman veterinarian on all 4 accused killed in police encounter: It has been 10 days to the day my daughter died. I express my gratitude towards the police & govt for this. My daughter’s soul must be at peace now. #Telangana pic.twitter.com/aJgUDQO1po
— ANI (@ANI) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पीडितेच्या कुटुंबाला आनंद” date=”06/12/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] चकमकीची बातमी ऐकून धक्का बसला, परंतु आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”चकमक संशयास्पद, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची प्रतिक्रिया” date=”06/12/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ]
The Hyderabad police encounter of the rape accused seems suspicious, must be investigated. This isn’t justice for the murdered woman.
— Tushar (@TusharG) December 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”महिला आयोग अध्यांची प्रतिक्रिया” date=”06/12/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] संपूर्ण देशात अशा घटनांविरोधात संताप आहे, सरकार कारवाई करु शकली नाही, मात्र पोलिसांनी कारवाई केली, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी उपोषण सोडलं [/svt-event]
काय आहे प्रकरण?
हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.
माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी
बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.
आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.
हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
चौघाही आरोपींच्या आईशी ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने बातचित केली. त्यावेळी चौघांच्याही मातांनी आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा द्या, ती आपल्या मंजूर असेल, अशी भूमिका घेतली होती. ‘मलाही एक मुलगी आहे. त्यांनी (आरोपी) त्या पीडित मुलीला ज्याप्रकारे पेटवलं, त्याचप्रमाणेच माझ्या मुलालाही जाळून टाका. मला काही त्रास होणार नाही’ अशी खंबीर भूमिका चिन्ना केशवुलूच्या आईने घेतली होती.
Hyderabad Rape and Murder Accuse Encounter