AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS पूजा खेडकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास पुढे काय होणार ? आयएएस पद जाणार का राहणार ?

पूजा खेडकर यांनी ओबीसी आणि दृष्टीबाधित श्रेणीत युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांनी अपंगत्व आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे सादर केली. युपीएससीत पूजा खेडकर यांना  821 देशात रॅंक मिळाली होती.

IAS पूजा खेडकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास पुढे काय होणार ? आयएएस पद जाणार का राहणार ?
puja khedkar iasImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 16, 2024 | 2:00 PM
Share

प्रशिक्षणार्थी असतानाही आयएएस पूजा खेडकर यांनी केलेल्या मागण्या आणि  गाडीला लाल दिवा वापरणे या कारणांनी त्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र आधार घेतल्याचा आरोप आहे. तसेच अन्य मागासवर्गियांचे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र वापरल्याचा देखील आरोप आहे. पूजा यांचे वडील माजी सनदी अधिकारी आहेत. तिचे आजोबा देखील आयएएस अधिकारी होते. तिच्या वडीलांना निवडणूक शपथ पत्रात त्यांचे जाहीर केलेले उत्पन्न 40 कोटी आहे. तरी तिने नॉन क्रिमी लेअरचे प्रमाणपत्र बिनदिक्कतपणे सादर करुन सवलतीचा लाभ घेत अन्य उमेदवाराची जागा अडवून त्याचे नूकसान केले आहे. पूजा या कोणत्याही दृष्टीने क्रिमी लेअर नाहीत हे त्यांचे उत्पन्नच सांगत आहे.

अपंगत्वाचा दाखल्याची चौकशी

2023 बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससी परीक्षेत देशात 821 रॅंक मिळाली होती. प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती झाल्यानंतर इंन्स्टाग्रामवर रिल्स टाकल्याने त्या  चर्तेत आल्या. त्यानंतर खरे तर तिने ट्रेनी आयएएस असताना देखील आपल्या ऑडी गाडीवर दिवा लावल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिने आयएएसची परीक्षा देताना सादर केलेल्या कागदपत्राची माहिती लोकांनी शोधून काढली तर धक्कादायक सत्य उघडकीस आले. तिने आपल्या गाडीवर बेकायदेशीरपणे लाल दिवा तर लावलाच शिवाय अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनचा ताबा घेतला. तसेच तिला सुरुवातीला होम पोस्ट मिळाल्याने देखील आश्चर्य होत आहे. तसेच तिची बदली देखील वाशिम येथे झाल्याने देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपंगत्वप्रमाणपत्र कोठून मिळविले ?

प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यानूसार पूजा खेडकर यांचा अपंगत्वाचा दाखला देखील खोटा असून शकतो असे म्हटले जाते. परंतू तिने आपली दृष्टी अधू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एखादे वेळी व्हीजिबल अपंगत्व सर्वांना दिसते. परंतू न दिसणारे अपंगत्व देखील असू शकते. यात कमी दिसणे, ऐकायला न येणे, लवकर आकलन न होणे अशी अनेक प्रकारची मानसिक अपंगत्व श्रेणी देखील असतात. पूजा यांनी नेमकं कोणत्या अपंगत्वाचा दाखला सादर केला आहे. त्यावर सर्व अवलंबून असल्याचे म्हटले जाते. काही अपंगत्व तात्पुरते देखील असू शकते. काही काळाने उपचारांनंतर व्यक्ती बरी देखील होऊ शकते. त्यामुळे त्यांनी नेमके कुठल्या प्रकारचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यांनी त्यासाठी दोनदा केलेला अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी अपंगत्वाचा दाखला कोठून मिळविला याचा तपास सुरु झाला आहे. आधी पूजा खेडकर यांनी अहमदनगर येथून अपंगत्वाचे सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

अपंग आणि ओबीसी कॅटेगरी

पूजा खेडकर यांनी ओबीसी आणि दृष्टीबाधित श्रेणीत युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांनी अपंगत्व आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे सादर केली. युपीएससीत पूजा खेडकर यांना  821 देशात रॅंक मिळाली होती.

दृष्टिबाधित श्रेणीत अर्ज केल्याने त्यांना मेडिकल टेस्टसाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात चाचणीसाठी बोलावले होते. परंतू अनेकदा बोलावून देखील त्या चाचणीसाठी गेल्याच नाहीत. त्यांनी आपल्याला कोविड असल्याचे सांगितले. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमधील बंधनकारक असलेल्या चाचण्या करण्यास मनाई केली. त्यांना व्हिजन लॉस टेस्टसाठी सप्टेंबरमध्ये एमआरआय टेस्ट काढायला सांगितले होते. त्यांनी त्यास देखील मनाई करीत एका प्रायव्हेट एमआरआय क्लिनिकमध्ये चाचणी करुन त्याचा रिपोर्ट पाठवून दिला.

प्रमाणपत्रात हेराफेरीचा संशय

सिव्हील सेवा परीक्षा पास उत्तीर्ण होणाऱ्या सर्व उमेवारांना त्यांच्या पसंतीच्या सेवा निवडण्याची संधी देताना कॅडर देण्यापूर्वी सर्वसाधारणपणे सर्वकागदपत्रांच्या सत्यता तपासण्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग (डीओपीटी)द्वारे केल्या जातात. एका अंडर सेक्रेटरीद्वारा या तपासण्या केल्या जातात. जर त्यांच्या प्रमाणपत्रात काही खोट आढळली तर डीओपीटी तपासणी पातळीवर काही तरी गडबड झाल्याचे म्हटले जाते. आता अनियमितेप्रकरणात डीओपीटीला युपीएससीला लेखी कळवावे लागणार आहे.

…तर फौजदारी कारवाई देखील होऊ शकते

पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने आता चौकशी सुरु केली आहे. जर पूजा खेडकर यांची निवड या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे झाल्याचे उघडकीस आल्यास तर त्यांना नोकरीतून बडतर्फ देखील केले जाऊ शकते. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील होऊ शकते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.