‘इग्नू’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

जुलैमधील शैक्षणिक प्रवेशासाठी इग्नूने (IGNOU) प्रवेशाच्या तारखेत वाढ केली आहे. (IGNOU extends the last date for submission of Online Re-registration)

'इग्नू'तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार
आता एकाच सत्रात दोन डिग्री घेता येणार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:07 PM

नवी दिल्ली: जुलैमधील शैक्षणिक प्रवेशासाठी इग्नूने (IGNOU) प्रवेशाच्या तारखेत वाढ केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर 2020 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, सर्टिफिकेट आणि अवेयरनेस प्रोग्रामवर या वाढीव मुदतीचा काहीही परिणाम होणार नसल्याचं इग्नूकडून सांगण्यात आलं आहे. (IGNOU extends the last date for submission of Online Re-registration)

इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठाने (इग्नू) अनेकदा प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. नंतर ही तारीख वाढवून 16 ऑगस्ट 2020 करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही तारीख वाढवून आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे वारंवार मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यामुळे आता अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्व कोर्ससाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना इग्नूच्या अधिकृत साईटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.

असा करा अर्ज

इग्नूच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर होमपेज उघडेल. त्यात तुम्हाला तुमची डिटेल्स भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं अकाऊंट लॉगइन होणार. या लॉगइन आयडीद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता. (IGNOU extends the last date for submission of Online Re-registration)

शुल्कही ऑनलाईन भरावे लागणार

शेवटी तुम्हाला नोंदणी शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन शुल्क भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता. (IGNOU extends the last date for submission of Online Re-registration)

संबंधित बातम्या:

जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे

नागपूर ग्रामीणमधील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंचा निर्णय

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप

(IGNOU extends the last date for submission of Online Re-registration)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.