नालासोपाऱ्या रुग्णवाहिकेतून अवैधरित्या दारुची वाहतूक, तीन लाखांपेक्षा अधिक दारुसाठा जप्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Illegal transportation of alcohol Nalasopara) आहे.

नालासोपाऱ्या रुग्णवाहिकेतून अवैधरित्या दारुची वाहतूक, तीन लाखांपेक्षा अधिक दारुसाठा जप्त
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 3:04 PM

नालासोपारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Illegal transportation of alcohol Nalasopara) आहे. गेल्या दीड महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर सर्व दुकानं बंद आहेत. दारुची दुकानंही बंद असल्यामुळे राज्यात वेगवेगळ्या मार्गाने दारुची अवैधरित्या वाहतूक सुरु आहे. याच दरम्यान नालासोपाऱ्यात रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक सुरु असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या नालासोपाऱ्यात एकच (Illegal transportation of alcohol Nalasopara) खळबळ उडाली आहे.

नालासोपारातील तुलिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांना रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकासह नाकाबंदीत रुग्णवाहिकेची तपासणी केली. त्यात रुग्णाऐवजी वेगवेगळ्या ब्रँडच्या दारुचे बॉक्स असल्याचे उघड झाले. यावेळी पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या चालकाला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेत एकूण तीन लाख 26 हजार 320 रुपयांचा दारुसाठा होता. पोलिसांनी दारुसाठी जप्त केला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. काल (13 मे) एकाच दिवशी 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात एकूण रुग्ण संख्या 263 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांचे नालासोपारा केंद्रबिंदू बनले असून एकट्या नालासोपाऱ्यात 84 कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाच्या महामारीत रुग्णवाहिकेची  ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. पण याच महामारीचा फायदा घेऊन नालासोपाऱ्यात चक्क रुग्णवाहिकेतून रुग्ण ऐवजी दारूची वाहतूक करतानाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पालघर जिल्ह्यात दारुची दुकानं सुरु झाली. मुंबईत मात्र दारूविक्री बंद करण्यात आली. याचीच संधी साधून पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघड झाला.

नुकतेच जालन्यातही लॉकडाऊन दरम्यान तब्बल पावणे अकरा लाखाचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 लाख 92 हजार 800 रुपयांचे मॅकडोल नंबर-1 दारुचे 124 बॉक्स, 1 लाख 53 हजार 600 रुपयांचे ब्लेंडर्स प्राईड दारुचे 10 बॉक्स, 17 हजार 500 रुपयांचे 100 पायपर्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, 5 हजार रुपयाची व्हाईट लेबल्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, 11 हजार रुपयांच्या चिवास रिगल (12) ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्सचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

Lockdown | जालन्यात अवैध दारुवर धडक कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

महसूल सोडा, सामाजिक विचार करा, चंद्रकांत पाटलांचा दारुविक्रीला विरोध

नियमांचे पालन न केल्यामुळे पुण्यातील 9 दारुच्या दुकांनावर गुन्हे दाखल

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.