Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!

हिवाळ्याच्या काळात आपली प्रतिकारशक्ती खूप कमकुवत होते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:27 PM

मुंबई : हिवाळ्याच्या काळात आपली प्रतिकारशक्ती खूप कमकुवत होते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. या विशिष्ट हंगामात विशिष्ठ जीवनसत्त्वे व्हायरल इन्फेक्शन अर्थात विषाणूंचा संसर्ग कमी करण्यात खूप फायदेशीर ठरतात. जर आपणही हवामानातील बदलांमुळे त्वरित आजारी पडत असाल तर आपल्याही आहारात व्हिटामिन-सी युक्त फळे खाण्याची आवश्यकता आहे (Immunity Booster ingredients during winter season).

थंडीच्या मोसमात आजार बळावू लागतात. विशेषतः संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढायला लागते. यंदा कोरोना विषाणूमुळे लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. डॉक्टरदेखील शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटामिन्सचे सेवन करण्याचा सल्ला देत आहेत. शरीराला व्हिटामिन्सची गरज असतेच. त्यातही व्हिटामिन सी सध्या अधिक महत्त्वाचे ठरते आहे. चला तर, व्हिटामिन सीने समृद्ध असलेल्या अशा फळांबद्दल जाणून घेऊया…

संत्री

‘संत्र’ हा व्हिटामिन सीचा प्रमुख्य स्रोत आहे. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटामिन सी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच हिवाळ्याच्या काळात संत्र्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे (Immunity Booster ingredients during winter season).

पेरू

हिवाळ्यात पेरूची आवक वाढते. म्हणून ‘पेरू’ला हिवाळी फळ देखील म्हटले जाते. पेरूमध्ये व्हिटामिन सी आणि पोषक तत्वांचे प्रमाण खूप आहे. पेरू रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास, तसेच मधुमेह कमी करण्यास मदत करतो. पेरूमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीराचा संसर्गापासून बचाव करतात.(Immunity Booster ingredients during winter season)

ब्रोकोली

फ्लॉवर सारखी दिसणारी ब्रोकोली एक हंगामी भाजी आहे. ब्रोकोलीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आणि फायबर असतात. ब्रोकोली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच वजन नियंत्रण करण्याचे कार्यदेखील करते (Immunity Booster ingredients during winter season).

किवी

दररोज किवीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते. याशिवाय किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आढळते.

नाशपती

नाशपतीदेखील एक हंगामी फळ आहे. अनेकांना त्याची आंबट-गोड चव आवडते. चवीबरोबरच नाशपती आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. नाशपतीमध्ये व्हिटामिन ई, व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

(Immunity Booster ingredients during winter season)

संबंधित बातम्या :

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.