Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्स

कोरोना विषाणूच्या (कोविड -१९ ) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात राज्यशासनाने काही सुचना जारी केल्या आहेत (Immunity booster tips amid Corona).

Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्स
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे आहेत उत्तम मार्ग
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 10:45 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड -19) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात राज्यशासनाने काही सुचना जारी केल्या आहेत (Immunity booster tips amid Corona). शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गठित केलेल्या टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19 ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने सुचवलेले आयुर्वेदिक औषध

संशमनी वटी 1 गोळी दिवसातून दोनदा असे 15 दिवस घ्यावी. तुळस 4 भाग, सुंठ 2 भाग, दालचिनी 2 भाग व काळी मिरी 1 भाग या द्रव्याचा भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे 3 ग्रॅम भरड चूर्ण 100 मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून 5-7 मिनिटे ठेवा. नंतर हे पाणी प्या. च्यवनप्राश 10 ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा). सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल/खोबरेल तेल बोटाने लावा. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा व नंतर हे तेल थुंका. नंतर गरम पाण्याने चूळ भरा. असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा.

युनानी औषधी

काढा (जोशंदा)-घटक द्रव्ये- बिहिदाना 5 ग्रॅम, बर्गे गावजबान 7 ग्रॅम, उन्नाब 7 दाने, सपिस्तान 7 दाने, दालचिनी 3 ग्रॅम, बनपाशा 5 ग्रॅम यांचा काढा करुन 250 मिलिलिटर पाण्यामध्ये 15 मिनिटे उकळा. गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून 1 किंवा 2 वेळा 15 दिवसांसाठी घ्या. खमीरा मरवारीद दुधासोबत 5 ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी

आर्सेनिकम अल्बम 30 – 4 गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे 3 दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांच्या औषधांचा कोर्स करा.आयुर्वेदिक औषधी

  1. टॅबलेट आयुष 64 – (500 मिलिग्रॅम) 2 गोळ्या दिवसातून 2 वेळा असे 15 दिवस घ्या.
  2. अगस्त्य हरितकी – 5 ग्रॅम दिवसातून 2 वेळा गरम पाण्यासोबत 15 दिवस घ्या.
  3. अणुतेल – तीळतेल – 2 थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाका.
  4. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.
  5. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

युनानी औषधी

  1. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब 5 थेंब मिसळून गुळण्या करा, असे 15 दिवस करा.
  2. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करुन तुपामध्ये परता. मध गरम करुन त्यामध्ये ही औषधे मिसळा. याचा वापर चूर्ण स्वरुपातही करता येतो. हे औषध 15 दिवस घ्या.
  3. ही औषधे व उपचार हे आजाराला प्रतिबंध व्हावा आणि अशा अनेक रुग्णांवरील पूरक उपचारास फायदेशीर ठरु शकतात म्हणून सुचवण्यात आले आहेत. तथापि केाविड 19 ची लक्षणे जाणवल्यास शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

  • वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करा,
  • वारंवार साबणाने हात 20 सेकंदापर्यंत धुवा.
  • खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
  • ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.
  • जिवंत प्राण्यांशी संपर्क टाळा. कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
  • पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळा.

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

  • ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्या. ऋतूनुसार भाज्यांचा समावेश करा.
  • तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
  • सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
  • कोविड-19 लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
  • थंड, फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जड असलेले पदार्थ टाळा.
  • थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळा.
  • विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
  • प्रशिक्षित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करा.
  • सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्या, ते पोषक आहे.
  • सुवर्ण दुग्ध / दुग्ध – 150 मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या.

टीप – कोविड-19 सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची औषधे.

संबंधित बातम्या :

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

Immunity booster tips amid Corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.