Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

मसाल्याच्या सर्वच घटकांमध्ये साधारणत: 25 ते 30 टक्के दरवाढ झालेली आहे. खसखसवरील आयात बंदी आता उठवल्यामुळे पुढील काळात तीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. एकंदर इंधन, एलपीजी आदींच्या दरवाढीनंतर आता मसाल्यांच्या दरात झालेली वाढ कंबरडं मोडणारी आहे.

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:30 AM

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये (indian Food culture) मसाल्यांना (spices) अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. अगदी पुरातण काळापासून भारतात मसाल्यांचा वापर केला जात असतो. अनेक जण विकतचे मसाले आणण्याऐवजी घरीच कच्चे मसाले आणून आपल्या पध्दतीने त्यांना कुटून, वाळवून व नंतर दळून त्यांची साठवणूक करीत असतात. साधारणत: उन्हाळा लागताच मसाले तयार करण्याची प्रक्रिया सुरु होत असते. पंरतु गेल्या काही महिन्यांचा विचार करता मसाल्यांच्या दरात मोठी वाढ (price increase) झालेली आहे. लालबाग मिरची मार्केटमधील ‘इंदुलकर मसाले’चे नीलेश सावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ऐन पीक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीसह अन्य मसाल्यांच्या पिकांची मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक पीक खराब झाल्याने यंदा मसाल्यांचे भाव पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे.

खसखस का महागली ?

भारतात तुर्कीतून मोठ्या प्रमाणाम खसखसची आवक होत असते. परंतु आयातीच्या धोरणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून खसखसच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. परिणामी देशांतर्गत उत्पादीत होत असलेलीच खसखस बाजारात उपलब्ध होत होती. त्यामुळे मागणी जास्त व तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने खसखसचे भाव गगणाला भिडले आहेत. आता सध्या खसखसच्या आयातीवरील बंदी उठवली असून बाहेरुन आयातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील उत्पादनानंतर खसखसचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा फटका

गेल्या वर्षी नाव्हेंबर, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ऐन मसाले पीक काढण्याच्या तयारीत असताना पावसाने घोळ केला. काढणीवर आलेली मिरची पावसाने खराब झाली. मिरचीच्या आतील भाग पाण्यामुळे काळवंडला आहे. अनेकांना हे पीक फेकून देण्याचीही वेळ आली. मिरचीसह अन्य मसाला पिकांचीही तीच गत झाली. त्यामुळे मालाचा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीसह अन्य मसाल्यांचा तुटवडा निर्माण होउन मसाल्याचे दर वाढले आहे.

प्रमुख मसाल्यांचे दर

मसाले आधीचे दर / आताचे दर / (किलोत)

काश्‍मीरी मिरची : 400 ते 500 : 600 ते 700

तिखट मिरची : 200 : 400

मालवणी मसाला : 500 : 800

मिरची पावडर : 500 : 700

धने : 550 : 750

खसखस : 1200 : 1800

लवंग : 800 : 1000 ते 1600

जिरे : 300 : 400

मोहरी : 200 : 260 ते 350

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मसाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मसाल्यांमध्ये आता झालेली दरवाढ हा त्याचाच परिपाक आहे. नवीन पीक येइपर्यंत दरवाढ कमी होण्याची कुठलीही लक्षणे सध्या दिसत नाहीत.

– नीलेश सावला, इंदुलकर मसाले, लालबाग-परळ.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणूक, नवीन प्रभाग रचनेचा परिणाम; कोणत्या प्रभागातून लढायचं यावरून संभ्रम

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.