Gujarat | 2 कोटींच्या दारूवर बुलडोझर
गुजारातमधील सुरतमध्ये तब्बल 2 कोटींच्या अवैध दारूसाठ्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. (illegal liquor destroyed)
गांधीनगर : गुजारातमधील सुरतमध्ये तब्बल 2 कोटींच्या अवैध दारूसाठ्यावर (illegal liquor) बुल्डोझर फिरवण्यात आला आहे. पलसाना आणि कडोदरा येथील पोलिसांनी मागील दोन वर्षांमध्ये ही दारू जप्त केली होती. सध्याच्या बाजारमुल्यानुसार या दारूची किंमत तब्बल 2 कोटी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा दारुसाठा मंगळवारी बारडोली गावाजवळ नष्ट केला गेला. (in Gujarat Surat police destroyed illegal liquor worth Rs 2 crore)
सुरतच्या पोलीस अधीक्षक उषा राडा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. “ही अवैध दारू पलसाना आणि कडोदरा या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातून जप्त केलेली आहे. हा दारुसाठा मागील दोन वर्षांमध्ये जप्त केलेला असून त्याची किंमत 2 कोटी 9 लाख रुपये आहे. ही दारू बारडोली गावाजवळ नष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वीसुद्धा गुजरातमध्ये अवैध दारुचा साठा नष्ट केलेला आहे. 11 डिसेंबर रोजी सुरत पोलिसांनी 88 लाखांची अवैध दारू नष्ट केली होती. नष्ट केलेली ही दारू वडोदरा येथील दारु तस्करांकूडन जप्त केली होती.
दरम्यान, तब्बल 2 कोटींची दारू नाष्ट केल्यामुळे नागिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, यानिमित्ताने गुजरातमध्ये चालू असलेल्या अवैध दारु व्यापाराबद्दलही या निमित्ताने बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध दारु व्यवसायावर वेळीच आवर घातला पाहिजे अशी मागणी गुजरातमधील नगरिकांकडून होत आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या
दाम्पत्याने बिल्डरकडून आठ कोटी उकळले, अटक केल्यानंतर आरोपी महिलेचं तांडव
नवरीही गेली, पैसेही गेले; ‘नवरी मिळे नवऱ्याला’ संस्थेचा उतावीळ नवरोबांना लाखोंचा गंडा
(in Gujarat Surat police destroyed illegal liquor worth Rs 2 crore)