AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळं निघालेल्या पाकिस्तानमधील नागरिक त्रस्त, गरिबीला कंटाळून जन्मदात्याने 5 मुलांना कालव्यात फेकलं

जन्मदात्या पित्यानेच आपल्या पाच मुलांना चक्क कालव्यात फेकल्याचा प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. (Pakistan five children Canal)

दिवाळं निघालेल्या पाकिस्तानमधील नागरिक त्रस्त, गरिबीला कंटाळून जन्मदात्याने 5 मुलांना कालव्यात फेकलं
| Updated on: Dec 06, 2020 | 9:00 PM
Share

इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमधील नागरिक हैराण झाले आहेत. गरिबीला कंटाळून पट्टोकी येथील एका पित्यानेच आपल्या पाच मुलांना चक्क कालव्यात फेकल्याचा प्रकार घडला आहे. पट्टोकीमधील जांबेर येथील कालव्यात ही पाच मुलं फेकण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यातील तीन मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर इतर पाच मुलांचा शोध घेणे सुरु आहे. घरातील गरिबीला कंटाळल्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. (In Pakistan man threw up his five children in Canal)

गरिबीला कंटाळल्याने मुलांना फेकलं

बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. यातील एकाचे नाव अहमद आहे. तो एक वर्षांचा आहे. तर दुसरी मुलीचे नाव फिजा असून तिचाही मृतदेह सापडला आहे. बाकीच्या तीन मुलांचा शोध घेणे सुरु आहे. पोलिसांनी सांगिल्याप्रमाणे या मुलांचा पिता घरातील गरिबीला कंटाळला होता. पत्नीशी वाद झाल्याने, संतापाच्या भरात त्याने हे भयानक कृत्य केले. पोलिसांनी सांगितले, की फेकून दिलेल्या एकूण दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन वर्षांची ताशा, पाच वर्षीय जैन आणि सात वर्षीय नादिया यांचा शोध घेणे अजूनही सुरु आहे.

पाकिस्तानवर 44.5 ट्रिलियन कर्ज

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तानमधील न्यूज वेबसाईट ‘इंटरनॅशनल द न्यूज’मध्ये आलेल्या बातमीनुसार जून 2020 पर्यंत पाकिस्तानवर तब्बल 44.5 ट्रिलियन एवढं कर्ज झालं आहे. हे कर्ज पाकिस्तानच्या एकूण जीडीपीच्या 106.8 टक्के एवढे आहे. तर एका रिपोर्टनुसार पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. 90 च्या दशकात  जशी होती; तशी पातळी पाकिस्तानी अर्थव्यवस्थेने गाठली आहे.

कर्जात सूट देण्याची इमरान खान यांची विनंती

दरम्यान,पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ज्या ‘देशांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे; त्या देशांवरील कर्जाचा बोजा कमी करावा’ अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेली आहे. पाकिस्तानवर असलेल्या कर्जात सूट देण्यात यावी, अशीदेखील विनंती इमरान खान यांनी केली होती. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात असल्यामुळे इनमरान खान इतर देशांकडून कर्ज घेऊन देशाचा कारभार चालवत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आयएमएफकडूनही कर्ज घेतलेले आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

काश्मीरमधील तरुणांना भडकावण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल, थेट तुर्कीतून नवं षडयंत्र होत असल्याचा आरोप

भारताची रणनीती यशस्वी, पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई

(In Pakistan man threw up his five children in Canal)

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.