AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपहरण नाही, भारतीय जवान सुरक्षित : संरक्षण मंत्रालय

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम इथं सुट्टीवर आलेल्या जवानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचं वृत्त खोटं आणि चुकीचं असल्याचा दावा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. हा जवान सुरक्षित असून तो आपल्या युनिटमध्ये परतला आहे, त्यामुळे संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. जाकली युनिटच्या सुट्टीवर आलेल्या मोहम्मद यासीन या भारतीय जवानाचं दहशतवाद्यांनी घरात घुसून […]

अपहरण नाही, भारतीय जवान सुरक्षित : संरक्षण मंत्रालय
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम इथं सुट्टीवर आलेल्या जवानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचं वृत्त खोटं आणि चुकीचं असल्याचा दावा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. हा जवान सुरक्षित असून तो आपल्या युनिटमध्ये परतला आहे, त्यामुळे संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन संरक्षण मंत्रालयाने केलं आहे.

जाकली युनिटच्या सुट्टीवर आलेल्या मोहम्मद यासीन या भारतीय जवानाचं दहशतवाद्यांनी घरात घुसून अपहरण केल्याचं वृत्त शुक्रवारी रात्री देशभरात पसरलं होतं. मात्र आज संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

“सुट्टीवर आलेल्या सैनिकाचं बडगामच्या काजीपूरा येथून अपहरण झाल्याचं माध्यमातील वृत्त खोटं आहे.  हा जवान सुरक्षित आहे”, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

मोहम्मद यासीन भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीरच्या लाईट इंफ्रंट्री युनिटचे जवान आहेत. ते 26 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत सुट्टीवर होते. याच दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळून त्यांचं अपहरण झाल्याचं वृत्त काल आलं होतं. मात्र आज संरक्षण मंत्रालयाने ट्विट करुन हे वृत्त खोडून काढले आहे.

जवानाच्या अपहरणाच्या वृत्तानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या शोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. या विशेष ऑपरेशनअंतर्गत बडगम परिसराला घेरावही घालण्यात आला होता. जवान मोहम्मद यासीन यांना त्यांच्या घराजवळील जंगलाच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती यासीन यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी दिल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.

यापूर्वीही जम्मू-काश्मीर येथून जवानांच्या अपहरण आणि हत्यांच्या घटना घडल्या आहेत. मे, 2017 मध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी अखनूर येथून एका जवानाचे अपहरण केले होते. एका लग्न समारंभातून त्या जवानाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या जवानाची निघृणपणे हत्या करण्यात आली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.