वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या इंदोरीकर महाराजांनी (Indorikar Maharaj controversy) त्यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे.
शिर्डी : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या इंदोरीकर महाराजांनी (Indorikar Maharaj controversy) त्यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे. कोणीही मोर्चा, रॅली, आंदोलन करु नये, असं आवाहन इंदोरीकर महाराजांनी (Indorikar Maharaj controversy) केलं आहे. “वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही करू नये. कायदेशीरपणे आपण बाजू मांडू”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे.
VIDEO : इंदुरीकर महाराज बोलले त्यात गैर काय? : सुरेश धस
इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रकात इंदोरीकर महाराजा म्हणतात, “चलो नगर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणा नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती”
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादानंतरही इंदोरीकर महाराज आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आपण चुकीचं बोललो नसून, विविध ग्रंथांचा संदर्भ दिला, असं ते म्हणाले.
आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज
यूट्यूब चॅनल्सवर खापर
यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी बीडमधील एका कीर्तन सोहळ्यात वादावर भाष्य करताना, यूट्यूब चॅनल्सवर खापर फोडलं होतं.
“यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा(अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.
एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदुरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.
संबंधित बातम्या
माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज
राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न
आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज