DC vs RR : सोपं लक्ष्य, तरी का हरली राजस्थानची टीम? संजूने सांगितलं कारण…

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलेलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.

DC vs RR : सोपं लक्ष्य, तरी का हरली राजस्थानची टीम? संजूने सांगितलं कारण...
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 10:54 PM

अबू धाबी : आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 33 धावांनी सोपा विजय मिळवला आहे. या विजयासाह दिल्लीने गुणतालिकेत 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. तसेच प्लेऑफचं तिकीटदेखील कन्फर्म केलं आहे. (Sanju Samson reveals the reason why Rajsthan Royals loss against Delhi Capitals)

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 155 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलेलं नाही. राजस्थानकडून या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने 70 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. परिणामी राजस्थानचा संघ या सामन्यात निर्धारित 20 षटकात 121 धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे राजस्थानला 33 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्लीच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा केला. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने या सामन्यात योगदान दिलं. नॉखियाने या सामन्यात सर्वाधिक 2 बळी घेतले. तर कगिसो रबाडा, आवेश खान, रवीचंद्नर अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे राजस्थानला 20 षटकात केवळ 121 धावाच जमवता आल्या.

…तर आम्ही जिंकलो असतो : सॅमसन

संजू म्हणाला की, “जर त्याच्या संघाकडे आणखी काही विकेट्स असत्या तर तो सामना जिंकू शकलो असतो.” तो म्हणाला, “आमच्याकडे असलेले फलंदाज पाहता 155 धावांचे लक्ष्य साध्य करता आले असते. मला वाटते की ते, आमच्या संघासाठी शक्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे. मला वाटते की पुढील सामन्यात आम्ही जोरदार पुनरागमन करू. पुढच्या सामन्यात संघात कोणकोणते बदल करावे लागतील याबद्दल आम्ही उद्या सकाळी चर्चा करु. खेळपट्टी इतकी संथ नव्हती. चेंडू थांबून येत होता. आमच्याकडे आणखी काही विकेट्स असत्या तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो.”

राजस्थानचा पहिला डाव

तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि अवघ्या 21 धावांत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने काही वेळ किल्ला लढवला खरा परंतु दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. आधी रिषभ पंत 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिमरन हेटमायरने काही वेळ फटकेबाजी करुन दिल्लीला शतक पूर्ण करुन दिलं. मात्र त्यालाही फार वेळ मैदानात तग धरता आला नाही.

ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. दिल्लीने कसाबसा दिडशे धावांचा टप्पा पार केला. राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकरियाने 4 षटकांमध्ये अनुक्रमे 22 आणि 33 धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अखेर निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(IPl 2021 : Sanju Samson reveals the reason why Rajsthan Royals loss against Delhi Capitals)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.