Election Results: जालन्यात घनसावंगी, तीर्थापुरीवर राष्ट्रवादीचे राजेश टोपेंचे वर्चस्व कायम, इतर तीन ठिकाणचे निकाल वाचा!

जालना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घनसावंगी आणि तीर्थापुरी या दोन पंचायत समित्यांवर राष्ट्रावादी काँग्रेस नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

Election Results: जालन्यात घनसावंगी, तीर्थापुरीवर राष्ट्रवादीचे राजेश टोपेंचे वर्चस्व कायम, इतर तीन ठिकाणचे निकाल वाचा!
जालन्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:42 PM

जालनाः जिल्यातील पाच नगर पंचायत निवडणुकींचा अंतिम निकाल हाती आला आहे. घनसावंगी, तीर्थापुरी, जाफ्राबाद, मंठा आणि बदनापूर या पाच नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. जालना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घनसावंगी आणि तीर्थापुरी या दोन पंचायत समित्यांवर राष्ट्रावादी काँग्रेस नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. या दोन्ही नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घनसावंगीत राष्ट्रवादीला 10 तर तीर्थपुरी नगरपंचायतीत 11 जागांवर विजय मिळाला आहे.

उर्वरीत तीन नगपंचायतीवर कुणाचे वर्चस्व?

बदनापूर- बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत भाजपने 9, तर राष्ट्रवादीने 5 जागांवर विजय मिळवला आहे. बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांनी वर्चस्व मिळवलं असून शिवसेनेला एकही जागा या नगर पंचायतीत मिळाली नाही.त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांना हा मोठा धक्का समजला जातोय. मंठा- मंठा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालं असून शिवसेनेचे 12 उमेदवार निवडून आले तर भाजपचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले आहे. मंठा नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धक्का बसला आहे. मंठा नगर पंचायत पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. जाफ्राबाद- जाफ्राबाद नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागेवर विजय मिळाला असून अपक्षांना 4 तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

जालना 5 नगर पंचायत पक्षनिहाय अंतिम निकाल-

जालना: घनसावंगी भाजप 0 शिवसेना 7 राष्ट्रवादी 10 काँग्रेस 0 इतर-0

जालना: मंठा भाजप 2 शिवसेना 12 राष्ट्रवादी 1 काँग्रेस 2 इतर- 0

जालना: जाफ्राबाद भाजप 1 शिवसेना 0 राष्ट्रवादी 6 काँग्रेस 6 इतर-4

जालना: तिर्थपुरी भाजप-2 शिवसेना-3 राष्ट्रवादी-11 काँग्रेस-1 इतर–0

जालना-बदनापूर: भाजप-9 शिवसेना -0 राष्ट्रवादी-5 काँग्रेस-1 इतर-2

इतर बातम्या-

बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबावर काळाचा घाला ; अपघातात चौघांचा मृत्यू

Uttar pradesh assembly election 2022: अखिलेश यादव आझमगडच्या गोपालपुरातून विधानसभा लढणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.