AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यातील बलात्कार पीडितेवर औरंगाबादेत घाईघाईत अंत्यसंस्कार, भावाचा आरोप

मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला (Mumbai Gang rape) बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरूणीवर घाईघाईत अंत्यसंस्कार (Jalna rape Case) करण्यात आले. पोलिसांनी दबाव टाकून तिच्यावर अंत्यसंस्कार करायला लावल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

जालन्यातील बलात्कार पीडितेवर औरंगाबादेत घाईघाईत अंत्यसंस्कार, भावाचा आरोप
| Updated on: Sep 01, 2019 | 1:26 PM
Share

औरंगाबाद : मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला (Mumbai Gang rape) बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरुणीवर घाईघाईत अंत्यसंस्कार (Jalna rape Case) करण्यात आले, पोलिसांनी दबाव टाकून तिच्यावर अंत्यसंस्कार करायला लावल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. मुंबईत सामूहिक अत्याचार (Jalna rape Case) झालेल्या पीडितेचा औरंबादेतील घाटी रुग्णालयात उपचारदरम्यान 28 ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही असे सांगत पीडितेच्या कुटुंबांनी तिचे पार्थिव स्वीकारण्यास मनाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  जालन्यातील बलात्कार (Jalna Girl gang rape) पीडितेच्या मृतदेहावर 72 तास उलटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकून काल मध्यरात्री औरंगाबादच्या स्मशानभूमीत तिचे अंत्यसंस्कार उरकण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या अंत्यविधीसाठी भावाला पोहचूही दिले नाही. असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

दरम्यान जालन्यातील तरुणीवर सामूहिक बलात्कार (Chunabhatti rape case) होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. शिवाय पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षणही दिलं जाणार आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास ‘सीबी-सीआयडी’कडे त्वरीत सोपविण्यात येईल. ‘सीबी-सीआयडी’कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जाईल. याशिवाय पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही या बैठकीत ठरविण्यात आलं.

पोलीस आणि डॉक्टरांची चौकशी होणार

या घटनेचा प्राथमिक तपास करताना मुंबईच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याची दखल घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही विजया रहाटकर यांनी दिले. याशिवाय औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डाक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही, हा आरोप लक्षात घेऊन संबंधित डाक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असंही विजया रहाटकर म्हणाल्या.

औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डाक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करावे. हे शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब करावा. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे, अशीही माहिती देण्यात आली. शिवाय पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जालन्यातील मुलीवर मुंबईत अमानुष अत्याचार, चौघांकडून सामूहिक बलात्कार

जालना जिल्ह्यातील तरुणी मुंबईतील चेंबूरमध्ये तिच्या भावाकडे आलेली होती. 7 जुलै रोजी घरी कुणीही नसताना तिला बाहेर बोलावण्यात आलं आणि चार जणांकडून पाशवी बलात्कार करण्यात आला. या तरुणीला ड्रग्जही देण्यात आले होते. घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही. मात्र तिचा हात आणि पाय निकामी होत असल्याचं दिसताच तिला अर्धांगवायू समजून उपचार सुरु करण्यात आले. मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर तरुणीवर बलात्कार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

यानंतर सर्व माहिती समोर येत गेली आणि औरंगाबादमध्ये सुरुवातीला गुन्हा नोंद करण्यात आला. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये हा सर्व प्रकार घडला असल्याने संबंधित विभागाच्या पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. दीड महिन्यानंतरही एकही आरोपी हाती लागलेला नाही. शिवाय पोलिसांकडून आणि डॉक्टरांकडूनही अपमानास्पद वागणूक दिली गेली असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय.

संबंधित बातम्या : 

जालना सामुहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला संरक्षण

आरोपीची माहिती दिली, पोलिसांनी बलात्कार झालाय हेच मान्य केलं नाही : पीडितेचा भाऊ

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.