कल्याणमध्ये नगरसेवकाच्या अटकेचा जाब विचारल्याने भाजप आमदारावरही गुन्हा
केडीएमसीच्या भाजप नगरसेवकावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी नगरसेवकासह त्याच्या दोन मुलांना दोन तास लॉकअपमध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे (Kalyan Kolsewadi Police file complaint Against MLA Ganpat Gaikwad).

ठाणे : केडीएमसीच्या भाजप नगरसेवकावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी नगरसेवकासह त्याच्या दोन मुलांना दोन तास लॉकअपमध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांना माहिती मिळताच ते तातडीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षकास फैलावर घेतले. तब्बल एक तास पोलीस ठाण्यात या प्रकरणावरुन गोंधळ सुरु होता. अखेर पोलिसांनी भाजप आमदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे (Kalyan Kolsewadi Police file complaint Against MLA Ganpat Gaikwad).
केडीएमसीतील भाजप नगरसेवक मनोज राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्यांचा काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल (14 ऑगस्ट) दुपारी हाणामारीत झाले. त्यानंतर राय हे आपल्या दोन मुलं आणि काही कार्यकर्त्यांसोबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले Kalyan Kolsewadi Police file complaint Against MLA Ganpat Gaikwad).
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही : देवेंद्र फडणवीस
मात्र, पोलिसांनी राय यांची तक्रार ऐकून न घेता त्यांना आणि त्यांच्या दोन मुलांना थेट लॉकअपमध्ये टाकल्याचा दावा राय पिता-पुत्रांनी केला आहे. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पूर्ण पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं.
याप्रकरणी सध्या पोलिसांनी मनोज राय आणि त्यांच्या विरोधकांवरही विरोधी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“एखाद्या प्रकरणात न्याय मागणं हे चुकीचं असेल तर माझ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत न्यायालयात दाद मागणार. ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत ते पोलीस ठाण्यात बसतात. तक्रार करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांनाच लॉकअपमध्ये टाकलं जातं. हा कुठला न्याय आहे?”, असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी केला.