Money Laundering प्रकरणात प्रसिद्ध निर्माता ईडीच्या रडारवर; अडचणीत मोठी वाढ

०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता, ईडीकडून सेलिब्रिटीला समन्स... कोण आहे हा प्रसिद्ध सिनेमा निर्माता?

Money Laundering प्रकरणात प्रसिद्ध निर्माता ईडीच्या रडारवर; अडचणीत मोठी वाढ
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 1:51 PM

200 Crore Money Laundering Case : 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंदशेखर (sukesh chandrasekhar) गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. आता याप्रकरणी प्रसिद्ध निर्माता करीम मोरानी याचं नाव देखील समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करीम मोरानी (karim morani) याला ईडीने समन्स पाठवलं आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश याच्या माध्यमातून घरी भेटवस्तू पाठवण्याच्या प्रकरणारत करीम मोरानी याचं नाव समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्यामुळे करीम मोरानी याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव समोर आल्यानंतर येत्या एक ते दोन दिवसांमध्ये करीम मोरानी ईडी समोर चौकशीसाठी उपस्थित राहवं लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची देखील अनेकदा चौकशी करण्यात आली. (sukesh chandrasekhar story)

सुकेश चंद्रशेखर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सध्या दिल्ली येथील मंडोळी तुरुंगात आहे. 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी सुकेश तिहार तुरुंगात होता. पण त्याठिकाणी देखील अनेक अभिनेत्री त्याला भेटण्यासाठी तुरुंगात येत होत्या. 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

कोण आहे करीम मोरानी ?

करीम मोरानी हा एक प्रसिद्ध निर्माता आहे. करीम मोरानी याने अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘रा वन’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. मोरानी आणि त्याचा भाऊ एली मोरानी एक फिल्म प्रॉडक्शन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मालक देखील आहेत. (200 Crore Money Laundering Case)

मोरानी यापूर्वी देखील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात देखील करीन मोरानी याचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये हैदराबाद पोलिसांनी दिल्लीतील २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मोरानी याच्यावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 23 सप्टेंबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने मोरानीला त्याच्याविरुद्धच्या बलात्कार प्रकरणी अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

त्यानंतर करीम मोरानी याला हैदराबाद पोलिसांसमोर सरेंडर करावं लागलं. आता निर्माता करीम मोरानी 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.