कुटुंबीय क्वारंटाईन, कोल्हापुरात कोरोनाग्रस्त बालिकेला महिला तहसीलदाराकडून मायेची ऊब
मुलगी कोल्हापुरात असल्याने आई-वडिलांची घालमेल,. तर कुटुंबापासून ताटातूट होणार असल्याने लहानगीही भांबावली. अशा परिस्थितीत तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी तिला मायेचा आधार दिला (Kolhapur Shirol Tehsildar Aparna More Dhumal calls Corona Patient Girl)
इचलकरंजी : कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील औरवाड गावातील 12 वर्षीय कोरोनाबाधित बालिका सीपीआरमध्ये (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) उपचार घेत आहे. तिचे कुटुंबीय शिरोळमध्येच क्वारंटाईन असल्याने ती काहीशी एकटी पडली. अशा परिस्थितीत चिमुरडीला शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी फोनवरुन आधार देत मायेची ऊब दिली. (Kolhapur Shirol Tehsildar Aparna More Dhumal calls Corona Patient Girl)
सलग तीन महिने कोरोना संकटातून आपल्या तालुक्याचा बचाव करण्यासाठी तहसीलदार कष्ट घेत होत्या. अशातच औरवाड मधील 12 वर्षीय बालिका कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. तिला उपचारासाठी सीपीआरला पाठवणे बंधनकारक होते. यासाठी तिला कुटुंबापासून वेगळे व्हावे लागले.
हे पाहिलंत का? : आर्थिक संकटात कोल्हापुरात खजाना गवसला, शेतकऱ्याला सापडलेल्या हंड्यात सोन्याची किती नाणी?
मुलीच्या नातेवाईकांना शिरोळ आगर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात तपासणीसाठी पाठवले. कुटुंबीय निगेटिव्ह आले, हे दिलासादायक असले तरी मुलगी कोल्हापुरात असल्याने आई-वडिलांसह सर्वांच्या मनाची घालमेल सुरु होती. तर कुटुंबापासून ताटातूट होणार असल्याने लहानगीही भांबावली होती
अशा बिकट परिस्थितीत तालुका प्रशासनाचे ओझे सांभाळत डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी तिला मायेचा आधार दिला. फोनवरुन संपर्क साधून तिला दिलासा दिला. प्रथम श्रेणीच्या अधिकारी असणाऱ्या मोरे यांनी कोणतीही बडेजाव न करता माणुसकीचे दर्शन घडवले. ही घटना लहानशी असली, तरी एवढ्या मोठ्या अधिकारी महिलेची संवेदनशीलता पाहून चिमुरडीचे कुटुंबही हरखून गेले. (Kolhapur Shirol Tehsildar Aparna More Dhumal calls Corona Patient Girl)
महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात शिरोळ तालुका आहे. सप्टेंबर 2019 मध्ये डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. तेव्हा महापुरानंतरचे काम त्यांच्यासमोर उभे ठाकले होते. तर आता ‘कोरोना’ संकट आ वासून उभे राहिले. कोरोनाची परिस्थिती महिला तहसीलदार पेलतील का, असा प्रश्न विचारला जात असताना डॉ. अपर्णा यांनी अहोरात्र मेहनत घेत आपल्या कामातून शंकाखोरांना चपराक दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या पोहचली 466 वर गेली आहे. आतापर्यंत 91 जणांना दिला डिस्चार्ज मिळाला आहे. तर चौघा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.
जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले! https://t.co/87vABMoei8
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2020
(Kolhapur Shirol Tehsildar Aparna More Dhumal calls Corona Patient Girl)