AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर देशभरात ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू सेनेचा इशारा

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay kumar) लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

...तर देशभरात 'लक्ष्मी बॉम्ब' प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू सेनेचा इशारा
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीमध्ये या सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अक्षयचा हा सिनेमा साउथच्या 'कंचना'चा रिमेक आहे.
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 10:20 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay kumar) लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब सिनेमातील कलाकार, डायरेक्टर यांच्या विरोधात माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सिनेमाला विरोध दर्शविला आहे. या सिनेमातून देवीचा अपमान करण्याबरोबरच लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याने आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा सिनेमा देशात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा हिंदू सेनेने दिला आहे.(Lakshmi Bomb’ will not be allowed to be displayed; Hint of Hindu Sena)

राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा सिनेमा देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या सिनेमातून ‘लव्ह-जिहाद’ला उत्तेजन दिले जात, असल्याचा दावाही हिंदू सेनेने केला आहे. जोपर्यंत आम्ही सांगितलेले बदल होणार नाहीत, तोपर्यंत देशामध्ये कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दिला आहे.

दरम्यान, या सिनेमात अक्षयने असिफ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर कियारा अडवाणी पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारत आहे. या सिनेमात असिफचे पूजावर प्रेम दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा नेटकऱ्यांचा समज झाला असून त्यामुळे त्यांनी या सिनेमासह अक्षयलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून माता लक्ष्मीच्या नावाचा गैरवापर करून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ची कथा काय?

‘लक्ष्मी बॉम्ब’मधील हा नायक भुतांवर विश्वास न ठेवणारा आहे. भारतात तो त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला भेटायला आला आहे. इथे लोकांची भुतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भुतं नसतात. भुतं असतील तर मला दिसतील तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा हा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागतात. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेले घरातील लोक अनेक उपाय करतात. सिनेमात पुढे आणखी काय काय घडते हे तुम्ही प्रत्यक्ष सिनेमाच पाहिल्यावर कळेल.

संवंधित बातम्या : 

अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर नेटकऱ्यांचा टीकेचा बॉम्ब

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

(Lakshmi Bomb’ will not be allowed to be displayed; Hint of Hindu Sena)

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....