सख्ख्या मुलीला दूर का लोटले? डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबाला प्रश्न

सेवाव्रती आमटे कुटुंबाने अधिकार देताना मुलगा-मुलगी भेद केल्याचा गंभीर आरोप शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे.

सख्ख्या मुलीला दूर का लोटले? डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबाला प्रश्न
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 2:01 PM

चंद्रपूर : ‘आनंदवन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनुभवी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte-Karajgi) यांच्या आत्महत्येनंतर समाजमन हादरलं आहे. त्यांच्या निधनाला दोन दिवस उलटत नाहीत, तोच नवी घडामोड समोर येत आहे. नैराश्यात असलेल्या मुलीला आमटे कुटुंबाने एकटे सोडल्याचा आरोप शीतल आमटे यांच्या सासू सुहासिनी करजगी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. (Late Activist Sheetal Amte-Karajgi’s in-laws writes an angry letter to the Amte Family)

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांनीच व्याही आमटे कुटुंबाला प्रश्न विचारणारी पोस्ट टाकली होती. अत्यंत व्यथित झाल्यामुळे त्यांनी आपले मन मोकळे केल्याचा दावा करण्यात आला आहे. सेवाव्रती आमटे कुटुंबाने सेवाप्रकल्प चालवताना, अधिकार देताना मुलगा-मुलगी भेद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ज्या कौस्तुभ आमटे यांना विश्वस्तांनी काढून टाकले, त्यांना दिवाळीच्या सुमारास पुन्हा कसे घेण्यात आले? असा सवालही करजगी दाम्पत्याने विचारला आहे. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरील ही पोस्ट सध्या डिलीट करण्यात आली आहे. डॉ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी ती पोस्ट आपल्या मातोश्री सुहासिनी करजगी यांनी लिहिली असल्याला दुजोरा दिला, मात्र या घटनाक्रमावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

काय होती डिलीट केलेली फेसबुक पोस्ट?

“हे पत्र मी दोन दिवसांपूर्वीच लिहिले होते आणि आज तिच्या कुटुंबियांनी (संपूर्ण आमटे परिवार) तिला दिलेला त्रास सहन न झाल्यामुळे तिने स्वतःला संपवले…… The End.

25-11-2020 च्या अनेक पेपरमधे शीतलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले आणि आश्चर्य पण वाटले.

यावर काही प्रतिक्रिया द्यावी की चूप रहावे हे कळत नव्हते. परंतु शेवटी विचार केला की शीतल ‘आमटे’ असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे, तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल?

आमटे कुटुंबाने (तिच्या स्वतःच्या आई-वडिलांनी आणि काका-काकूंनी) तिचाबद्दल असे संयुक्त निवेदन (स्वाक्षरी करुन) द्यावे यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी काय असू शकते.

ज्या दिवशी गौतम-शीतलचे लग्न झाले त्या दिवसापासून शीतलला मी माझी मुलगीच मानले. आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काही प्रश्न विचारते.

1. शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असं तुम्हीच लिहिले आहे, मग जर शीतलला आज काही मानसिक ताण आणि नैराश्य आहे, तर तिला सांभाळून आपुलकीने जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे ?

कारण आनंदवनात सगळया handicapped (mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते मग सख्ख्या मुलीबाबत बोभाटा का ? की यामागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे??

डॉ. प्रकाश आमटे यांना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद साधता आला नाही त्यांना ?

सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय ?

2. कौस्तुभ आमटे यांना परत विश्वस्त मंडळावर घेतले. मला विचारावेसे वाटते की त्यांना काढले का होते ???

खास गोष्ट म्हणजे ज्या सगळया ट्रस्टींनी त्यांना काढले, त्यांनीच परत घेतले. तर आमच्यासारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्यामागचे कारण काय होते ??

आता परत घेतले तर त्यांनी अशी काय विशेष कामगिरी केली ???

मागच्या 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटेंचे नावही कुठे वाचण्यात आले नाही. इतकी वर्ष ते होते कुठे?

की आमटे कुटुंबही सर्वसामान्य माणसांप्रमाणे मुलगा (घराण्याचा वारस) आणि मुलीमध्ये फरक करतात ???

आज मी सर्वांना खुले आवाहन करते की आनंदवनला जावे आणि शीतल-गौतम यांनी जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे. आणि मग काय ते ठरवावे.

आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला-मुलींमध्ये फरक करावा ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. नाही का ?

(Late Activist Sheetal Amte-Karajgi’s in-laws writes an angry letter to the Amte Family)

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा। श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा। ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी। ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा।

कौस्तुभ आमटेंच्या बाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील.

ज्या प्रचंड गती आणि डेडीकेशनने आज आणि मागच्या अनेक वर्षांपासून शीतल आणि गौतम यांनी आनंदवनात काम केले आहे, त्याला तोडच नाही. त्याबद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो.

इथे मला आमटे लोकांना आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढे प्रचंड जबाबदारीचे काम कसे काय करू शकेल?

आज आत्ता मी आनंदवनातच आहे आणि शीतल-गौतम शिवाय इथे आमटे कुटुंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही. तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शीतल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंटची काळजी घेते आहे.

मग ती जर स्वत: मानसिकरित्या आजारी आहे (तिच्या आई-वडिलांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे) तर सगळे आमटेज तिच्या भरोशावर पूर्ण आनंदवन सोडून हेमलकसाला काय करत आहेत ?

सगळे आमटे शीतल-गौतमच्या विरुद्ध कट-कारस्थान तर रचत नाही ना ?

विकास आमटे आणि प्रकाश आमटेंबद्दल हे सगळं लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी, हे माझे दुर्भाग्यच आहे.

त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी एवढेच माझे म्हणणे आहे.

शीतलला कसलाही मानसिक त्रास नाही आणि हा त्रास तिच्यावर जबरदस्ती लादला जात आहे. तो पण तिच्या सख्ख्या आई-वडिलांकडून हे तिचं खरं दुर्भाग्य आहे.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आमचे पूर्ण करजगी कुटुंब सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि पुढेही राहू.

सुहासिनी करजगी

शिरीष करजगी

संबंधित बातम्या :

Dr. Sheetal Aamte | सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

Photos : समाजसेवेचा अविरत वसा घेणाऱ्या आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या ‘डॉ. शीतल आमटे-करजगी’

हे सगळं काही धक्कादायक, अनपेक्षित; डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची प्रतिक्रिया

(Late Activist Sheetal Amte-Karajgi’s in-laws writes an angry letter to the Amte Family)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.