AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजप्रताप यादव यांची प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला त्रास, रशियन लसीचा इफेक्ट?

ते म्हणाले की, लोक माझ्या म्हणण्याची खिल्ली उडवतात. हसण्यावर नेतात. माझ्या वडीलांच्या बोलण्यावरही लोक असेच हसायचे. काहींना तर मी दुसरा लालू वाटतो.

तेजप्रताप यादव यांची प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला त्रास, रशियन लसीचा इफेक्ट?
Tejpratap health update
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 6:32 AM

लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav)यांची तब्येत अचानक बिघडलीय. तेजप्रताप यांनी ताप आलाय आणि श्वास घ्यायलाही त्रास होतोय. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुतिन लस घेतलेली आहे. त्यानंतर ते आजारी पडलेत. त्यांचे लहान भाऊ तेजस्वी यादव हे तातडीनं तेजप्रताप यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलेत. डॉक्टरांची एक टीम तेजप्रताप यांच्यावर घरीच उपचार करतीय.

तेजप्रताप यांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांच्यावर घरीच उपचार केले जातायत. काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच तर अॅब्युलन्ससह सर्व बाबी तयार ठेवलेल्या आहेत. पण सध्या तरी तेजप्रताप यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भाऊ तेजस्वी यादव मोठ्या भावाच्या सोबतच आहेत.

प्रकृती स्थिर रशियन लस दोघांनीही घेतलीय. पण तेजस्वी यादव यांना कुठलाही त्रास झाला नाही पण तेजप्रताप यांची मात्र अचानक प्रकृती बिघडली. त्यांचं अंग दुखत होतं. तापही आला. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. पण काही उपचार केल्यानंतर त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मला दुसरा लालू म्हणतात! सोमवारी आरजेडी पक्षाला पंचेवीस वर्ष पूर्ण झाली. यावेळेस तेजप्रताप यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधीतही केलं. यावेळेस त्यांनी नितीशकुमार यांच्यावर एकीकडे टीका केली तर दुसरीकडे स्वत:ची तुलना वडील लालू यादव यांच्याशी केली. ते म्हणाले की, लोक माझ्या म्हणण्याची खिल्ली उडवतात. हसण्यावर नेतात. माझ्या वडीलांच्या बोलण्यावरही लोक असेच हसायचे. काहींना तर मी दुसरा लालू वाटतो.

पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.