Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

मागील काही दिवसांपासून राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं भरली आहेत (Water storage in Maharashtra Dam).

Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.
Follow us
| Updated on: Aug 30, 2020 | 9:24 AM

मुंबई : मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि एकूणच राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं भरली आहेत (Water storage in Maharashtra Dam). यात काही धरणं तर 100 टक्के भरुन त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर काही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांमधून होत असलेल्या विसर्गामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. दुसरीकडे अनेक रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

कोयना धरण

कोयना धरण आज (30 ऑगस्ट) पहाटे 4 वाजेपर्यंत 100 टीएमसी भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. सध्या धरणात 100.17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 4 दिवसांपासून कोयना धरणातून पूर्ण क्षमतेने नदीपात्रात पाणी विसर्ग केला जात आहे.

नागपूर

नागपूर जिल्ह्यात तोतलाडोह आणि पेंच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शनिवारी (29 ऑगस्ट) दिवसभरात जिल्ह्यात 81.43 मीमी पावसाची नोंद झाली. पेंच धरणाचे 16, तर तोतलाडोह धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले. शनिवारी 4 वाजेपर्यंत पेंच जलाशयातून 6839 क्यूसेक तर तोतलाडोहमधून 6693 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांवर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं मोठा फटका बसला आहे.

मध्य प्रदेशातील चौराई धरणाचं पाणी सोडल्यानं नागपूर जिल्ह्यातील पेंच आणि कन्हान या नद्यांना पूर आला होता. यामुळं कान्हान, कामठी, मौदा या तालुक्यामधील काही गावांमध्ये पाणी शिरलं. यात अनेक घराचं नुकसान झालं. पिकं नष्ट झाली, जनावरं वाहून गेली. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की शेकडो जनावरं वाहून गेली. कामठी तालुक्यातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात गाई, म्हशी पाण्याच्या प्रवाहात वाहून चालल्याचं दिसत आहे.

हतनूर धरण

भुसावळ हतनूर धरणाचे आणखी 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत या धरणाचे एकूण 41 दरवाजे उघडण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणातून 146860.00 क्यूसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

गडचिरोली

गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे उडल्याने गडचिरोली जिल्ह्याला पुराचा फटका बसलाय. त्यामुळे जिल्ह्याचा विदर्भाशी संपर्कही तुटला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली-नागपूर बंद झाला आहे. आलापल्ली-आष्टी-चंद्रपूर महामार्ग, गडचिरोली-चामोर्शी मार्ग, आरमोरी-ब्रम्हपुरी मार्ग बंद झाले आहेत. या मार्गांच्या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने हे 4 पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. तर देसाईगज तालुक्यातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहेत. वैनगंगा नदीत गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने नदीने धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. गोसीखुर्द धरणाचे 26 दरवाजे 3.50 मीटरने, तर 7 दरवाजे 4 मीटरने उडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून 23326.61 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

पुणे

खडकवासला धरणातून शुक्रवारी (30 ऑगस्ट) रात्री 10 वाजता 9416 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जातोय. पुणे शहराला 5 महिने पुरेल इतक्या पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं सध्या 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

औरंगाबाद

जायकवाडी धरण 28 ऑगस्टपर्यंत 85 टक्के भरलं आहे. जायकवाडी धरणात सध्या 86 टीएमसी पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात गोदावरी नदीतून पाण्याची आवक सुरुच आहे. ही पाणी आवक कायम राहिल्यास जायकवाडी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली

Koyna Dam | कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे केले बंद

Gadchiroli Rain | गडचिरोलीत मुसळधार पाऊस, अनेक घरात शिरलं पाणी

संबंधित व्हिडीओ :

Water storage in Maharashtra Dam

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.