होम आयोलेशनमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक, केंद्राकडून राज्यांना पत्र, होम क्वारंटाईनचे नवे आदेश जारी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे (Guidelines of home isolation).
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी होम आयसोलेशबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत (Guidelines of home isolation).
“काही राज्यांमध्ये सर्रासपणे होम आयसोलेशनला अनुमती दिली जात आहे. मात्र, त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य किंवा घराच्या शेजारच्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. विशेषत: दाट वस्तीत तसं होऊ शकतं. त्यामुळे अशा भागातील रुग्णांना होम आयसोलेशसाठी अनुमती देऊ नये”, असं लव अग्रवाल यांनी पत्रात म्हटलं आहे (Guidelines of home isolation).
“रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू शकतो का, याची खातरजमा करावी. याशिवाय जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम असेल”, असं पत्रात सांगितलं आहे.
“दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये विशेषत: शहरी भागांमध्ये होम आयसोलेशनसाठी अनुमती दिली जाऊ नये. कारण या निर्णयामुळे रुग्णाच्या कुटुंबातील इतर व्यक्ती आणि आजूबाजूच्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते”, असं लव अग्रवाल यांनी पत्रात बजावलं आहे.
दरम्यान, लव अग्रवाल यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यापेक्षा रुग्णालयं किंवा सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण होम आयसोलेशनमुळे इतरांना संसर्गाचा धोका आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
संबंधित बातमी :
Maharashtra Corona Update | राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण