AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशी कंपनीने 50MP कॅमेऱ्याचा फोन लॉंच केला,फिचर्स भन्नाट आणि किंमत इतकी कमी

देशी मोबाईल निर्मिती कंपनीने कमी किंमतीचा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. रोजच्या वापरासाठी हा फोन चांगला आहे. या फोनची किंमत सुरुवातीला कमी ठेवली आहे. नंतर तिच्या किंमतीत वाढ होणार आहे.

देशी कंपनीने 50MP कॅमेऱ्याचा फोन लॉंच केला,फिचर्स भन्नाट आणि किंमत इतकी कमी
LAVA Yuva 4
| Updated on: Nov 28, 2024 | 3:09 PM
Share

देशी स्मार्टफोन बनविणारी कंपनी लावाने आपला नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. कंपनीने Lava Yuva 4 लॉंच केलेला आहे. हा एक एन्ट्री लेव्हल डीव्हाईस आहे. यात तुम्हाला HD+ डिस्प्ले मिळत आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येतो. हा फोन Unisoc T606 प्रोसेसर सह बाजारात आला आहे. हा फोन एण्ट्री लेव्हल युजर्ससाठी तयार केलेला आहे.यात तुम्हाला 5000mAh बॅटरी आणि 50MPचा रिअर कॅमेरा मिळत आहे. याची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये पाहूयात…

लावाचा हा फोन केवळ एक कॉन्फिग्रेशनमध्ये आला आहे. याच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. तुम्हाला ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये मिळेल. फोनची ही किंमत शुभारंभाची प्राईज आहे.म्हणजे नंतर या फोनची किंमत वाढणार आहे. तुम्ही या फोनला लावा रिटेल आऊटलेटमध्ये खरेदी करु शकता. या फोनला एक वर्षाची वॉरंटी आहे. तसेच ब्रंड फ्री सर्व्हीस एट होमची ऑफर देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घरबसल्या सर्व्हीस दिली जाणार आहे.

स्पेसिफिकेश काय ?

Lava Yuva 4 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर Unisoc T606 प्रोसेसर मिळत आहे. हा काही पॉवरफूल प्रोसेसर नसला तरी तुमची रोजची कामे करु शकतो.

50MP चा मुख्य कॅमेरा

हा स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेजसह उपलब्ध होत आहे. यात तुम्हाला 128GB स्टोरेज मिळतो. परंतू कंपनीने या व्हेरीएंटच्या किंमतीचा उलगडा नाही केला आहे. हॅंडसेट स्टोरेजला 512GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने एक्सपांड करता येते. या डुएल सिमचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. ज्याला एलईडी फ्लॅश आहे.तर 8MPचा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. सुरक्षेसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील दिलेला आहे. यात 3.5 mm चा ऑडीओ जॅक आणि fm radio देखील आहे. लक्षात असू द्या की हा एक 4G डिव्हाईस आहे. त्यावर तुम्हा 5G सेवा मिळणार नाही. हा स्मार्टफोन USB Type-C पोर्टसह मिळतो. हॅंडसेटमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. जी 10w च्या चार्जिंगला सपोर्ट करते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.