Live Update : भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात
[svt-event title=”किरीट सोमय्या यांचे महापौर पेडणेकरांवर आरोप” date=”28/09/2020,1:30PM” class=”svt-cd-green” ] किरीट सोमय्यांचे महापौर किशोरी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप. किरीट सोमय्या मनपा कार्यालयात पोहोचले. अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मालक/संचालक/स्थापक म्हणून किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केल्याचा आरोप. १५ सप्टेंबर २०१२ रोजी स्थापना/रजिस्ट्रेशन केले. किश लिमिटेड या कंपनीला […]
[svt-event title=”किरीट सोमय्या यांचे महापौर पेडणेकरांवर आरोप” date=”28/09/2020,1:30PM” class=”svt-cd-green” ] किरीट सोमय्यांचे महापौर किशोरी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप. किरीट सोमय्या मनपा कार्यालयात पोहोचले. अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मालक/संचालक/स्थापक म्हणून किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केल्याचा आरोप. १५ सप्टेंबर २०१२ रोजी स्थापना/रजिस्ट्रेशन केले. किश लिमिटेड या कंपनीला गेली अनेक वर्ष बीएमसीचे कोव्हिडसह अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत असल्याचा आरोप. एसआरएचे झोपडपट्टीवासीयांचा सदनिकाही महापौरांनी हडप केल्याचा आरोप. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पुरावे दिल्याचा दावा. किरीट सोमय्या यांची महापौरांवर कारवाईची मागणी. किशोरी पेडणेकर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप. [/svt-event]
[svt-event title=”किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात ” date=”28/09/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुंबई महापालिकेसमोर आंदोलन, महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी, किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/yXBy6vUleJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट” date=”28/09/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट, मार्केटमध्ये आलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांची लूट, चाकू आणि तलवारीच्या धाकावर लूट होत असल्याच्या तक्रारी, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास कळमना पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप, कळमना मार्केटमधील फळ व्यापाऱ्यांचं पोलीस स्टेशनवर आंदोलन, राजेश छाबरानी आणि चिंटू महाराज यांच्या नेतृत्त्वात आंदोलन, संतप्त व्यापाऱ्यांनी केला पोलीस स्टेशनला घेराव करण्याचा प्रयत्न [/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्यात पर्यटन व्यवसायाला 500 कोटींचा फटका” date=”28/09/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात पर्यटन व्यवसायाला 500 कोटींचा फटका, अजिंठा वेरूळ बीबी का मकबरासह अनेक पर्यटन स्थळे बंदच, पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे पाच हजार लोकांचा व्यवसाय बुडाला, पर्यटन स्थळे बंदच औरंगाबाद शहर जिल्ह्याला मोठा फटका, अनेक टुरिस्ट आणि ट्रॅव्हल्स कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर, तर छोटे व्यावसायिक आणि गाईड्सवर उपासमारीची वेळ [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गावर सुरु केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला चाकरमन्यांचा प्रतिसाद” date=”28/09/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गावर सुरु केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला चाकरमन्यांचा प्रतिसाद, रत्नागिरी सिंधुदुर्गातून जवळपास 700 प्रवासी मुंबईकडे, आरक्षण तिकिट आणि स्क्रिनिंगवर रेल्वे प्रशासनाचा भर, 2 ऑक्टोबरपासून राजधानी एक्स्प्रेस देखिल धावणार [/svt-event]
[svt-event title=”कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका” date=”28/09/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका, गेल्या सहा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचे 2 हजार कोटींचे नुकसान, हॉटेल, लॉजिंग व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत, आजही अनेक समुद्र किनारे पर्यटकांशिवाय ओस, दिवळी आणि ख्रिसमसकडे व्यवसायिकांचे लक्ष्य [/svt-event]
[svt-event title=”आजपासून पश्चिम रेल्वेत लेडीज स्पेशल ट्रेन सुरू” date=”28/09/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] आजपासून पश्चिम रेल्वेत लेडीज स्पेशल ट्रेन सुरू, सहा नव्या सबअर्बन रेल्वे 28 सप्टेंबरपासून सुरू, दोन लेडीज सेपेशल ट्रेन सुरू, पश्चिम रेल्वेत आता 506 सबर्बन रेल्वे सेवा सुरू [/svt-event]
[svt-event title=”शिर्डी जवळील राहाता शहरात अतिक्रमण काढण्यावरून तणाव” date=”28/09/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] शिर्डी जवळील राहाता शहरात अतिक्रमण काढण्यावरून तणाव, नगर पालिकेने ईदगाह मैदानाजवळील अतिक्रमण रात्री काढले, संतप्त नागरिकांचा घटनास्थळी जमाव, तणावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी येथून अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवला, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त घटनास्थळी, राहाता शहरात तणावाचे वातावरण [/svt-event]
[svt-event title=”नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ” date=”28/09/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, 15 दिवसात 7 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबले, एका पंधरवड्यात अडीच लाखांच्या सोन्याची लूट, चेन स्नॅचिंग करणारी टोळी शहरात पुन्हा सक्रिय, आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश [/svt-event]
[svt-event title=”आई आणि मुलाची रेल्वेखाली आत्महत्या” date=”28/09/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] आई आणि मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, रात्री 2 वाजेच्या दरम्यानची घटना, लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील कोटमगाव हद्दीती रेल्वे ट्रॅकवर केली आत्महत्या, आत्महत्याचे कारण अस्पष्ट, अंजली राजेश भूसनळे, उत्कर्ष राजेश भूसनळे असे मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचे नाव [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी- कोकण रेल्वे विद्युतीकरणाची महिन्याभरात चाचणी” date=”28/09/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- कोकण रेल्वे विद्युतीकरणाची महिन्याभरात चाचणी, कोकण रेल्वेच्या 741 किलोमिटर लांबीच्या रेल्वे मार्गावर होणार विद्युतीकरण, विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्यात, रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्र, विद्युतीकरणाच्या कामासाठी सुमारे 1100 कोटी इतका खर्च अपेक्षित, विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची वर्षाला 100 कोटींची इंधन बचत होणार [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”28/09/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]