जगभरात ‘नमस्ते’ला प्राधान्य, फ्रान्सचे अध्यक्ष आणि जर्मनीच्या चान्सलर यांचाही एकमेकांना नमस्कार!
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांचं स्वागत करण्यासाठी खास भारतीय पद्धतीचा उपयोग केला (Macron Merkel Switch To Namaste).
नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांचं स्वागत करण्यासाठी खास भारतीय पद्धतीचा उपयोग केला (Macron Merkel Switch To Namaste). मॅक्रॉन यांनी पुढे झुकत मार्केल यांना नमस्ते केलं. कोरोना संसर्गाच्या या काळात भारतीय परंपरेत महत्त्वाचं स्थान असलेल्या नमस्तेला चांगलंच महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसत आहे. अंजेला मार्केल दक्षिण फ्रान्समध्ये आल्या असताना हे स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे मॅक्रॉन आणि मार्केल यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
इमॅन्युअल मॅक्रोन यांनी यांनी स्वतः मार्केल यांचा भारतीय पद्धतीने स्वागत करतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. यात मॅक्रॉन मार्केल यांचं नमस्ते करुन स्वागत करताना दिसत आहेत. त्यानंतर मार्केल यांनी देखील हात जोडून नमस्ते करत मॅक्रॉन यांना प्रतिसाद दिला.
Willkommen im Fort de Brégançon, liebe Angela! pic.twitter.com/lv8yKm6wWV
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) August 20, 2020
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरात भारतीय नमस्तेला चांगले दिवस आले आहेत. अनेक जागतिक स्तरावरील नेते या पद्धतीचा उपयोग करताना दिसत आहेत. मॅक्रॉन आणि मार्केल या जागतिक स्तरावरील दोन दिग्गज नेत्यांमध्ये यावेळी अनेक जागतिक विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली. यात कोरोना साथीचा प्रसार, बेलारुसमध्ये निवडणुकीनंतर तयार झालेली अस्थिर स्थिती आणि तुर्कीसोबत वाढता तणाव इत्यादी विषयांचा समावेश होता.
हात मिळवण्याऐवजी कोरोना काळात खबरदारी म्हणून भारतीय नमस्तेचा उपयोग करणाऱ्या जागतिक नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंझामाईन नेत्यान्याहू यांचाही समावेश आहे. त्यांनी देखील अनेक ठिकाणी हात मिळवून स्वागत करण्याऐवजी नमस्ते करण्याला प्राधान्य दिलं आहे.
नेत्यान्याहू हे जागतिक स्तरावर नमस्ते करण्याला प्राधान्य देणारे पहिले पंतप्रधान ठरले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, “माझ्याप्रमाणे हातात हात घेणं टाळा. तुम्ही भारतीय पद्धतीप्रमाणे नमस्ते करु शकता. किंवा हात जोडून स्वागतासाठी इतर शब्दही वापरु शकता. मात्र, हातात हात घेणं टाळा, त्याला पर्याय शोधा.”
मार्च 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प देखील आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वऱ्हाडकर यांना हात जोडून नमस्ते करताना दिसले. वऱ्हाडकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले होते, “आम्ही आज हात मिळवले नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि जे करणार होतो ते केवळ बोललो. त्यावेळी काहीसं असहज वाटलं.” विशेष म्हणजे ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी देखील लंडनमध्ये नमस्ते केल्याचा व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला होता.
हेही वाचा :
तिसऱ्या देशाची लुडबूड नको, काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ
Macron Merkel Switch To Namaste