Madhur Bhandarkar | नकारानंतरही शीर्षकाची कॉपी, मधुर भांडारकर करण जोहरवर भडकले!

मागूनही देत नाही म्हटल्यावर करणने थेट नाव प्रदर्शित केले, असे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे.

Madhur Bhandarkar | नकारानंतरही शीर्षकाची कॉपी, मधुर भांडारकर करण जोहरवर भडकले!
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 6:36 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींवर आधारित वेब रिअॅलिटी शो ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. आता या कार्यक्रमामुळे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) संतप्त झाले आहेत. ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, त्यांनी ते करण जोहरला (Karan Johar) देण्यास नकार दिल्याचा दावा, मधुर भांडारकर यांनी केला आहे. मधुर यांनी शोचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता यांना त्यांच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली आहे (Madhur Bhandarkar calls out Karan Johar over title of The Fabulous Lives of Bollywood Wives).

या बरोबरच त्यांची करण जोहरवर थेट शीर्षक चोरीचा आरोप केला आहे. मागूनही देत नाही म्हटल्यावर करणने थेट नाव प्रदर्शित केले, असे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

‘करण जोहर, कृपया माझा प्रोजेक्ट खराब करू नकोस’

मधुर भांडारकर यांनी याबद्दल ट्विट करत लिहिले की, ‘प्रिय करण जोहर, तू आणि अपूर्व मेहता यांनी मला वेब शोसाठी ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव मागितले होते. मी त्याला नकार दिला होता, कारण माझा त्याच नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे. तरीही आपण आपण ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव वापरलेत, जे नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचे आहे. कृपया, माझा प्रोजेक्ट खराब करू नका. या शोचे शीर्षक बदलण्यासाठी मी नम्रपणे विनंती करतोय.’(Madhur Bhandarkar calls out Karan Johar over title of The Fabulous Lives of Bollywood Wives)

(Madhur Bhandarkar calls out Karan Johar over title of The Fabulous Lives of Bollywood Wives)

स्टार पत्नींचे आयुष्य…

‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’मध्ये बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींचे जीवन जवळून बघायला मिळणार आहे. हा शो करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसने अर्थात ‘धर्मा प्रोडक्शन’ने तयार केला आहे. अपूर्व मेहता धर्मा प्रोडक्शनचे सीईओ आणि निर्माता आहेत. या शोचा ट्रेलर 13 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे.

(Madhur Bhandarkar calls out Karan Johar over title of The Fabulous Lives of Bollywood Wives)

या शोमध्ये संजय कपूरची पत्नी महेप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी, अभिनेत्री नीलम कोठारी दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवरील हा शो बरेच आश्चर्याचे धक्के देणार आहे. स्टार पत्नींचे आयुष्य इतके जवळून दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’च्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, संजय कपूर, समीर सोनी, अनन्या पांडे, संजय कपूरसुद्धा दिसले आहेत. हा शो 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

(Madhur Bhandarkar calls out Karan Johar over title of The Fabulous Lives of Bollywood Wives)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.