इमरती देवींचं नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ
आइटम हा सर्रास वापरला जाणारा आणि संसदीय शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. | Kamal Nath
भोपाळ: काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजप आमदार इमरती देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याने सध्या मध्य प्रदेशातील राजकारण प्रचंड तापले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी आपली बाजू मांडली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात. त्यामुळे मी आइटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही. सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आइटम आहे’, असा केल्याचे स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिले. (Congress leader Kamal Nath on controversial statement about Imarti Devi)
आइटम हा सर्रास वापरला जाणारा आणि संसदीय शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. यामध्ये अपमानजनक काय आहे? भाजपकडे सध्या बोलण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते कोणताही मुद्दा धरून बसतात, अशी टीकाही कमलनाथ यांनी केली.
याशिवाय, कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील फटकारले. शिवराज सिंह चौहान हे अभिनेते आहेत. ते मुंबईत गेले तर मध्य प्रदेशचे नाव मोठे होईल. गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनयच करत होते. ही गोष्ट आता जनतेच्या लक्षात येईल, अशी टीका कमलनाथ यांनी केली.
#WATCH I said something, it wasn’t to insult anyone… I just didn’t remember the (person’s) name…this list (in his hand) says item no.1, item no.2, is this an insult? Shivraj is looking for excuses, Kamal Nath doesn’t insult anyone, he’ll only expose you with truth: Kamal Nath https://t.co/YSbqd8PHGH pic.twitter.com/rqzVWuqYTl
— ANI (@ANI) October 19, 2020
(Congress leader Kamal Nath on controversial statement about Imarti Devi) तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन मध्य प्रदेशात भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून आज मौन धारण करून कमलनाथ यांचा निषेध करण्यात आला.
कमलनाथ काय म्हणाले होते? मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, “‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं काय नाव घेऊ, तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगलं ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं, ‘काय आयटम आहे’.”
संबंधित बातम्या:
‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
MP congress crisis | राहुल गांधींचा हुकमी एक्का मोदींच्या भेटीला, मध्य प्रदेशात काँग्रेस संकटात
(Congress leader Kamal Nath on controversial statement about Imarti Devi)